गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय उद्या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून स्मार्ट सिटी मिशन, अमृत आणि प्रधानमंत्री आवास योजना-शहरी योजनांचा सहावा वर्धापनदिन साजरा करणार


या कार्यक्रमात इंडिया स्मार्ट सिटीज पुरस्कार स्पर्धा (ISAC) 2020 आणि क्लायमेट स्मार्ट सिटीज मूल्यमापन चौकट (CSCAF) चे निकाल जाहीर होणार

विद्यार्थी, युवक, स्वयंसेवी संघटना, संस्था आणि व्यक्ती/ समूह यांच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना- शहरीवरील लघुपट स्पर्धेची घोषणा होणार

Posted On: 24 JUN 2021 4:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जून 2021

 

25 जून 2021 रोजी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय स्मार्ट सिटी मिशन, अमृत आणि प्रधानमंत्री आवास योजना- शहरी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 जून 2015 रोजी सुरू केलेल्या परिवर्तनकारी योजनांचा सहावा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी एका ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे.

शहरी पुनरुत्थानाचा दृष्टीकोन समोर ठेवून या तीन योजना सुरू करण्यात आल्या होत्या आणि भारताच्या लोकसंख्येत 40% वाटा असलेल्या शहरात राहणाऱ्या लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या उद्देशाने त्यांची बहु स्तरीय रचना करण्यात आली होती.

या कार्यक्रमात केंद्रीय शहरी व्यवहार मंत्रालयाकडून हाती घेण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या उपक्रमांना अधोरेखित करण्यात येईल. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील. केंद्रीय शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्र यांनी या कार्यक्रमासाठी केंद्र आणि राज्याच्या सर्व संबंधितांना निमंत्रित केलं आहे.

राष्ट्रीय शहरी व्यवहार संस्थेलाही याच दिवशी 45 वर्षे पूर्ण होत आहेत. केंद्रीय शहरी व्यवहार मंत्रालयाची ही स्वायत्त संस्था असून तिला शहरीकरणाशी संबंधित संशोधन आणि वापर यातील तफावत दूर करण्याची जबाबदारी सोपवली आहे.

या 6व्या वर्धापनदिन कार्यक्रमात इंडिया स्मार्ट सिटीज पुरस्कार स्पर्धा (ISAC) 2020 आणि क्लायमेट स्मार्ट सिटीज मूल्यमापन चौकट (CSCAF) चे निकाल जाहीर होणार आहेत.

डेटा मॅच्युरिटी ऍसेसमेंट फ्रेमवर्क (DMAF) आणि क्लायमेट स्मार्ट सिटीज ऍसेसमेंट (CSCAF) यांचे निकालही या कार्यक्रमात जाहीर करण्यात येणार आहेत.

तसेच इंडिया स्मार्ट सिटीज फेलोशिप अहवाल, तुलिप वार्षिक अहवाल आणि शहरी व्यवहार राष्ट्रीय संस्थेने तयार केलेल्या ज्ञान उत्पादनांचे देखील प्रकाशन केले जाणार आहे.

 

* * *

S.Tupe/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1730050) Visitor Counter : 238