माहिती आणि प्रसारण मंत्रालय

ई- कार्यालयांचा अंगिकार करत प्रसार भारतीचे कागदविरहित कामकाज

Posted On: 24 JUN 2021 3:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जून 2021

 

प्रसार भारतीमध्ये तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कामकाजाला चालना मिळाली आहे. आता कामकाजाचे स्वरुप पूर्वीसारखे राहिले नसून केवळ दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत 577 केंद्रे आणि दूरदर्शन, आकाशवाणीच्या 22,348 कर्मचाऱ्यांनी ई- कार्यालय कामकाजाचा स्वीकार केला आहे. कोविड महामारीच्या काळात देशभरातील कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनच्या काळात आणि त्यानंतरही अनेक मर्यादांतर्गत काम करावे लागत असताना प्रसार भारतीमध्ये अतिशय सुसज्ज असलेल्या माहिती तंत्रज्ञान आधारित कामकाजाच्या सुविधा अतिशय उपयुक्त ठरल्या.

प्रसार भारतीचे कामकाज अधिक कार्यक्षम आणि कागदरहित करण्यासाठी ऑगस्ट 2019 मध्ये ई-कार्यालय पद्धती सुरू करण्यात आली. प्रसार भारतीच्या 577 केंद्रांपैकी 10% नी 2019 मध्ये (ऑगस्ट- डिसेंबर), 74% नी 2020 मध्ये आणि उर्वरित 16% नी 18 जून 2021 पर्यंत या पद्धतीचा स्वीकार केला आहे.

यामुळे या संस्थेची कामाची गती आणि पारदर्शकता वाढली असून आतापर्यंत 50 हजार पेक्षा जास्त ई-फायली तयार करण्यात आल्या आहेत. या प्रत्येक फायलीची सद्यस्थिती ऑनलाईन उपलब्ध आहे. या फायलींशी संबंधित विभाग त्यांचा अंतर्गत मागोवा घेऊ शकतील. एखादी विशिष्ट फाईल पुढे सरकली आहे की एका विभागात थांबली आहे की ती पूर्ण झाली आहे ते समजू शकणार आहे. साधारणपणे एका प्रत्यक्ष फाईलचा निपटारा करण्याची संपूर्ण प्रक्रिया करण्यासाठी एका आठवड्याचा कालावधी लागतो. मात्र, ई-ऑफिसचा अवलंब केल्यामुळे हा कालावधी आता 24 तासांवर आला आहे आणि काही वेळा तर केवळ दोन तासांमध्ये काम पूर्ण होऊ लागले आहे.

परिणामी गेल्या दोन वर्षात निपटारा झालेल्या फायलींच्या संख्येत आणि याच कालावधीत दर महिन्याला निपटारा होत असलेल्या फायलींच्या सरासरी संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

प्रसार भारतीमधील (आकाशवाणी- दूरदर्शन) ई- फाईलची निर्मिती आणि निपटारा यामध्ये आघाडीवर असलेली पहिली 10 कार्यालये खालील प्रमाणे आहेत:

Offices

Total number ofe-Files cleared since August, 2019

Monthly average of e-Files disposed since August, 2019

CEO Office

11,186

500+

DG DD Office

6897

300+

DG AIR Office

5973

270+

DG DD News Office

3872

170+

DG AIR News Office

721

30+

Head of Technology

3351

150+

Head of HR

13,331

600+

Head of Admin

6121

275+

Head of Operations

2751

125+

Head of Finance

3533

160+

या उपक्रमामुळे प्रसारभारतीची कार्यालये कागदविरहित कामकाज करू लागल्याने संस्थेचा कागदावर होणारा खर्च ऑगस्ट 2019 ते जून 2021 या काळात  45% नी कमी झाला आहे.    

कार्बन फूटप्रिंट कमी करण्याशिवाय कागदरहित कामकाजामुळे महामारीच्या काळात दूरस्थ कामकाज, घरून काम करण्याची सुविधा इत्यादींमुळे संसर्गाचा धोका कमी होऊन कोविडपासून सुरक्षा उपलब्ध व्हायला मदत झाली आहे.

 

* * *

S.Tupe/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1730022) Visitor Counter : 168