आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड – 19 लसीकरणाविषयी अद्ययावत माहिती
29.35 कोटींपेक्षा अधिक लसीकरणाच्या मात्रा राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना पुरविण्यात आल्या
2.14 कोटींपेक्षा अधिक लसीच्या मात्रा अद्याप राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध
Posted On:
22 JUN 2021 3:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जून 2021
कोविड – 19 लसीकरणाच्या सार्वत्रिकरणाचा नवीन टप्पा कालपासून सुरू झाला. चाचणी, रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध, उपचार आणि कोविड प्रतिबंधक वर्तन यासह लसीकरण हा देखील महामारी विरोधातील सरकारच्यालढ्यामधील धोरणाचा अविभाज्य घटक आहे. देशभरात कोविड – 19 च्या लसीकरणाची गती वाढविण्यासाठी आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. पंतप्रधानांच्या हस्ते 16 जानेवारी 2021 रोजी देशव्यापी कोविड – 19 लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. लसींची उपलब्धता आणि अधिक लस उपलब्ध करून देऊन राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना भविष्यातील सक्षम नियोजन करता येईल आणि लस पुरवठा साखळी सुलभ करता येईल, अशा प्रकारे लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे.
देशव्यापी लसीकरणाचा भाग म्हणून, भारत सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत कोविड लसींचा पुरवठा करीत आहे. कोविड – 19 लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकरणाच्या नवीन टप्प्यामध्ये, केंद्र सरकार देशातील लस उत्पादकांकडून 75 % लस खरेदी करून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना (मोफत) पुरवण्यात येईल.
29.35 कोटींपक्षा अधिक (29,35,04,820) लसींच्या मात्रा आतापर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना भारत सरकारमार्फत (विनाशुल्क) आणि थेट राज्यांकडून खरेदी या माध्यमातून उपलब्ध झाल्या आहेत.
आज सकाळी 8 वाजता उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, यापैकी वाया गेलेल्या लसीच्या मात्रा धरून 27,20,14,523 लसीकरणाच्या मात्रा वापरल्या गेल्या आहेत.
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अद्याप 2.14 कोटींपेक्षा अधिक (2,14,90,297) लसीच्या मात्रा उपलब्ध आहेत.
शिवाय, 33,80,590 पेक्षा अधिक लसीकरणाच्या मात्रा येणार आहेत आणि पुढील 3 दिवसात राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना मिळणार आहेत.
* * *
S.Tupe/S.Shaikh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1729377)
Read this release in:
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam