शिक्षण मंत्रालय

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते योगिक विज्ञानाच्या एनआयओएस पदविका अभ्यासक्रमाचे उद्घाटन

Posted On: 21 JUN 2021 6:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जून 2021

 

केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते आज जागतिक योगदिनानिमित्त, मुक्तशिक्षणासाठीची राष्ट्रीय संस्था- एनआयओएस'च्या योगिक विज्ञानविषयक पदविका अभ्यासक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या अभ्यासक्रमाची माहिती देणाऱ्या साहित्याचे त्यांनी उद्घाटन केले. योगक्षेत्राविषयी शिक्षण घेण्यास उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी असा व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु केल्याबद्दल त्यांनी  एनआयओएसचे अभिनंदन केले.

योगाचे महत्व, विशेषतः कोविड काळातल्या त्याच्या उपयोगाविषयी बोलतांना संजय धोत्रे म्हणाले की योगाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहे. योगिक विज्ञानविषयक आज सुरु झालेल्या पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणारे लोक स्वतः रोजगार मिळवू शकतात आणि रोजगार देऊही शकतात. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जाहीर होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या परिश्रमांचा त्यांनी उल्लेख केला. यावेळी.

एनआयओएस च्या अध्यक्षांनी देखील या पदविका अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली. हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम असून पहिल्या वर्षी पाच विषय आहेत. ज्यात, योगशिक्षण आणि प्रशिक्षण शिकवले जाईल. आणि दुसऱ्या वर्षी पाच विषयांद्वारे योगिक उपचार शिकवले जातील, असे त्यांनी सांगितले.


* * *

M.Chopade/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1729126) Visitor Counter : 123