उपराष्ट्रपती कार्यालय
योगास आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवावे: उपराष्ट्रपती श्री व्यंकया नायडू यांचे जनतेला आवाहन.
उपराष्ट्रपतींनी आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्ताने केला योगाभ्यास.
Posted On:
21 JUN 2021 9:00AM by PIB Mumbai
योगास आपल्या दैनंदीन जीवनाचा भाग बनवावे असे आवाहन उपराष्ट्रपती श्री एम व्यंकय्या नायडू यांनी जनतेस केले आहे.
योग, केवळ आपले शारिरीक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखत नाही तर साऱ्या समाजाचे निरामय आरोग्यही सुनिश्चित करतो असे त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्ताने दिलेल्या शुभेच्छांमधे म्हटले आहे. "योग व्यक्ती आणि राष्ट्र दोहोंसाठी हितकारक आहे" असेही ते म्हणाले.
याआधी श्री नायडू यांनी पत्नी श्रीमती ऊषा नायडू यांच्यासह उपराष्ट्रपती निवासाच्या हिरवळीवर योगाभ्यास केला.
***
UUjgare/VGhode/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1728992)
Visitor Counter : 221