आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतातील सक्रीय कोविड रुग्णसंख्येत घसरण होऊन आता 8,26,740 रुग्ण सक्रीय, 71 दिवसांनंतर नोंदवली सर्वात कमी रुग्णसंख्या
गेल्या 24 तासांत 67,208 नव्या बाधितांची नोंद
एका दिवसात रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या सलग 35व्या दिवशी नव्या दैनंदिन बाधितांहून जास्त
रोगमुक्ती दरात आणखी सुधारणा होऊन सध्या तो 95.93% वर
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर सध्या 3.48%, सलग 10 व्या दिवशी पॉझिटीव्हिटी दर 5% हून कमी
Posted On:
17 JUN 2021 10:31AM by PIB Mumbai
भारतात रोज नव्याने नोंदल्या जाणाऱ्या कोविड बाधितांची संख्या सतत कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांच्या कालावधीत देशात 67,208 नव्या कोविड बाधितांची नोंद झाली.
देशात दैनंदिन पातळीवर नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या गेले सलग 10 दिवस 1 लाखांहून कमी राहिली आहे. केंद्र सरकार आणि राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश सरकारे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण आणि एकत्रित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.
भारतात सक्रीय कोविड बाधितांच्या संख्येत आता सतत घसरण दिसून येत आहे. देशातील सक्रीय कोविड बाधितांची संख्या आज 8,26,740 आहे.गेल्या 71 दिवसांतील सक्रीय रुग्णसंख्या घसरणीच्या तुलनेत ही सर्वात कमी संख्येची नोंद आहे.
गेल्या 24 तासांच्या कालावधीत रुग्णसंख्येत एकूण 38,692 ने घट झाली आणि देशातील सध्याची सक्रीय रुग्णसंख्या आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या केवळ 2.78% इतकी आहे.
देशातील अधिकाधिक लोक कोविड-19 आजारातून बरे होत असल्यामुळे देशात दैनंदिन पातळीवर नव्याने रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या आता सलग 35 व्या दिवशी नव्या बाधितांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. गेल्या 24 तासांत 1,03,570 रुग्ण कोविडमधून मुक्त झाले असल्याची नोंद झाली.
.गेल्या 24 तासांत दैनंदिन पातळीवर नव्याने संसर्ग होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत 36 हजारांहून अधिक (36,362) व्यक्ती रोगमुक्त झाल्या.
महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत कोरोना आजार झालेल्यांपैकी 2,84,91,670 व्यक्ती कोविड -19 मधून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत आणि गेल्या 24 तासांत 1,03,570 रुग्ण रोगमुक्त झाले आहेत त्यामुळे आता एकूण रोगमुक्ती दर 95.93%, झाला असून या दरात सतत सुधारणा होत असल्याचे दिसत आहे.
देशभरात कोविड संसर्ग निश्चित करण्यासाठीच्या चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढविण्यात येत असून गेल्या 24 तासांत संसर्ग निश्चित करण्यासाठी देशात एकूण 19,31,249 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 38 कोटी 52 लाखांहून अधिक (38,52,38,220) चाचण्या केल्या आहेत.
एकीकडे देशात चाचण्यांचे प्रमाण वाढविले जात असतानाच दुसरीकडे साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दरात सतत घसरण दिसून येत आहे. साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 3.99% असून दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 3.48% इतका आहे. हा दर सलग 10 व्या दिवशी 5% हून कमी राहिला आहे.
भारतात आतापर्यंत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या एकूण 26 कोटी 55 लाख मात्रा दिल्या गेल्या आहेत. आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, देशात 36,58,159 सत्रांच्या आयोजनातून कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 26,55,19,251 मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत लसीच्या 34,63,961 मात्रा देण्यात आल्या.
***
Jaidevi PS/Sanjana C/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1727843)
Visitor Counter : 199