अर्थ मंत्रालय

कोविड -19 मध्ये मदत आणि व्यवस्थापनात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरील जीएसटी दरात बदल

Posted On: 12 JUN 2021 5:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जून 2021

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेची 44वी बैठक आज केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे  झाली.  कोविड -19 मध्ये मदत आणि व्यवस्थापनात वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट वस्तूंवरील जीएसटी दरात 30 सप्टेंबर 2021 पर्यंत कपात करण्याचा निर्णय परिषदेने आपल्या बैठकीत घेतला आहे.

या बैठकीला केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री आणि अर्थ मंत्रालयातील तसेच राज्ये व  केंद्रशासित प्रदेशांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिफारसींचा तपशील खाली दिला आहे:

क्रमांक

  वस्तू 

सध्याचा जीएसटी दर

जीएसटी परिषदेने  शिफारस केलेला  जीएसटी दर

 

  1. औषधे

1.

टॉसिलीझूमब

5%

   शून्य

2.

अ‍ॅम्फोटेरिसिन बी

5%

   शून्य

3.

   हेपारिनसारखे अँटी-कोगुलेंट्स(साकळनरोधक)

12%

5%

4.

रेमडिसीवीर

12%

5%

5.

कोविड उपचारासाठी आरोग्य आणि

कुटुंब कल्याण मंत्रालय आणि औषधनिर्माण

विभाग यांनी शिफारस केलेले इतर

कोणतेही औषध        

 सध्या लागू दर      

 

5%

  1. ऑक्सिजन, ऑक्सिजन निर्मिती उपकरणे आणि संबंधित वैद्यकीय उपकरणे

1.

 वैद्यकीय श्रेणी  ऑक्सिजन    

12%

5%

2.

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर  / जनरेटर,वैयक्तिक आयातीसह                   

12%

5%

3.

 व्हेंटिलेटर्स     

12%

5%

4.

व्हेंटिलेटर मास्कस  / कॅन्युला / हेल्मेट

12%

5%

5.

बीआयपीएपी मशीन  

12%

5%

6.

एचएफएनसी उपकरण

12%

5%

  1. चाचणी संच आणि यंत्र

1.

कोविड चाचणी संच    

12%

5%

2.

निर्दिष्ट दाह निदान संच जसे डी -डायमर आयएल -6, फेरीटिन आणि एलडीएच            

12%

5%

  1. कोविड -19 संबंधित इतर मदत सामग्री

1.

पल्स ऑक्सिमीटर, वैयक्तिक आयातीसह

12%

5%

2.

हॅण्ड सॅनिटायझर  

18%

5%

3.

तापमान तपासणी उपकरणे     

18%

5%

4.

स्मशानभूमीसाठी गॅस / इलेक्ट्रिक / इतर भट्ट्या त्यांचे अधिष्ठापन इत्यादी

18%

5%

5.

रुग्णवाहिका     

28%

12%

ही  दरकपात / सवलत  30 सप्टेंबर 2021 पर्यंत लागू राहील.

S.Tupe/S.Kulkarni/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1726569) Visitor Counter : 290