PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 10 JUN 2021 9:05PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • India reports less than 1 lakh cases for the 3rd Day
  • 94,052 new cases in last 24 hours
  • 1,51,367 patients recovered during last 24 hours
  • Recoveries continue to outnumber the Daily New Cases for the 28th consecutive day
  • 2,76,55,493 total Recoveries across the country so far
  • Recovery Rate increases to 94.77%
  • Daily positivity rate at 4.69%, less than 10% for 17 consecutive days.
  • Testing capacity substantially ramped up – 37.21 cr tests total conducted
  • Vaccine Doses administered so far under Nationwide Vaccination Drive crosses 24 Cr mark (24,27,26,693)

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

Image

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 10 जून 2021

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

भारतात गेल्या चोवीस तासात 94,052 नव्या रुग्णांची नोंद. देशात सलग तिसऱ्या दिवशी 1 लाखापेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. केन्द्र सरकार, राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि एकत्रित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

भारतात सक्रिय रूग्ण संख्येत सातत्याने घट होत आहे. देशातील सक्रीय रुग्णसंख्या सध्या 11,67,952 आहे. सलग 10 व्या दिवशी ती वीस लाखांपेक्षा कमी आहे. गेल्या 24 तासात रुग्णसंख्येत एकूण 63,463  ने घट झाली आणि देशाच्या एकूण सक्रीय रुग्णसंख्येच्या  ती केवळ  4% इतकी  आहे.

कोविड संसर्गातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण बरे होत आहेत. देशात सलग 28 व्या दिवशी दैनंदिन नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासात 1,51,367 रुग्ण बरे झाले.  दैनंदिन नव्या रुग्णांच्या तुलनेत 57,315 आणखी रुग्ण गेल्या 24 तासात बरे झाले.

महामारीच्या सुरुवातीपासून कोविड-19 संसर्ग झालेल्यांपैकी 2,76,55,493 जण आधीच बरे झाले आहेत. तर गेल्या 24 तासात 1,51,367 रुग्ण बरे झाले.  त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांचा  कल वाढता असून बरे होण्याचा एकूण दर 94.77% वर पोहचला आहे.

देशात चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ कायम असून गेल्या 24 तासात एकूण 20,04,690 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकूण 37.21 कोटींपेक्षा अधिक (37,21,98,253) चाचण्या करण्यात आल्या.

देशभरात एकीकडे चाचण्यांचे प्रमाण वाढत आहे त्याचवेळी साप्ताहिक पॉझिटीव्हीटीमधे घसरणीचा कल कायम आहे.  साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर सध्या 5.43% तर दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 4.69% आहे. सलग 17 व्या दिवशी तो 10% पेक्षा कमी आहे.

देशव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत गेल्या 24 तासात लसीकरणाने 24 कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासात 33,79,261 लसीच्या मात्रा देण्यात आल्या. सात वाजेपर्यंत उपलब्ध माहितीनुसार, 33,82,775 सत्रांमध्ये, एकूण 24,27,26,693 लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

 

इतर अपडेट्स :

 

महाराष्‍ट्र अपडेट:

राज्यात कोरोना संक्रमणाची  दुसरी लाट सातत्याने ओसरत आहे. निकषानुसार जिल्ह्यांची  वेगवेगळ्या स्तरामध्ये  विभागणी केल्यानुसार निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर गेल्या सोमवारपासून नवीन कोरोना रुग्णांची संख्या कमी राहिली आहे. बुधवारी राज्यात कोरोनातून 16,379 रुग्ण बरे झाले. परिणामी, बरे झालेल्या रूग्णांची एकूण संख्या 55,97,304 वर पोहोचली आहे. परिणामी, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही  95.45 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. पुण्यातील दैनंदिन रुग्णांची संख्या इतर शहरांपेक्षा अजूनही जास्त आहे, त्यानंतर त्यानंतर मुंबई व कोल्हापूरचा क्रमांक लागतो.

 

गोवा अपडेट:

लस उत्सवामुळे सरकार लोकांपर्यंत पोहोचू शकले असे नमूद करून, मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, राज्य सरकार 18-44 वयोगटातील जास्तीत जास्त लोकांना लसीच्या मात्रा  देण्यासाठी लस उत्सव 3.0  सुरु करण्याचा  विचार करीत आहे. केंद्र सरकारने अलीकडेच कोविड व्यवस्थापन  प्रोटोकॉलमधून परजीवी प्रतिरोधक औषध काढून टाकल्यानंतर इव्हर्मेक्टिन खरेदीचा प्रस्ताव राज्य सरकारने रद्द केला.बुधवारी 456 नवीन कोविड रुग्ण आढळले त्यामुळे  सक्रीय रुग्णांची संख्या 5790 वर पोहोचली आहे.तसेच बुधवारी 16 मृत्यूची नोंद झाली. राज्यात  रुग्ण बरे होण्याचा दर 94.61% आहे.

Important Tweets

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

M.Chopade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1726054) Visitor Counter : 181