गृह मंत्रालय

पद्म पुरस्कार -2022 साठीचे नामनिर्देशन 15 सप्टेंबर, 2021पर्यंत खुले

Posted On: 10 JUN 2021 5:28PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 जून 2021


2022 साली प्रजासत्ताक दिनी घोषित होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी नामनिर्देशन/शिफारस आता करता येणार आहेत. नामनिर्देशन पाठवण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2021 आहे.

पद्म पुरस्कारांसाठीचे नामनिर्देशन / शिफारशी या केवळ पद्म पुरस्कार पोर्टलवरच स्विकारल्या जातील. 

https://padmaawards.gov.in.

पद्म पुरस्कार, अनुक्रमे पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत. यांची सुरुवात 1954 मधे झाली असून दरवर्षी प्रजासत्ताक दिनी या पुरस्कारांची घोषणा केली जाते.  उल्लेखनीय कार्याचा गौरव या पुरस्काराद्वारे केला जातो. सर्वच क्षेत्रातील असामान्य कामगिरी/सेवा करणाऱ्यांचा सन्मान केला जातो. यात कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, औषधशास्त्र, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग इत्यादी सर्वच क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्यांना गौरवले जाते. जात, पद, लिंग, जागा असा कुठलाही भेद न करता सर्वजण या पुरस्कारासाठी पात्र आहेत. डॉक्टर आणि वैज्ञानिक वगळता सार्वजनिक उपक्रमासह सरकारी नोकरीत असणारे पद्म पुरस्कारासाठी पात्र नाहीत.

केन्द्रीय गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावर (www.mha.gov.in) पुरस्कार आणि पदक या शिर्षकाखाली या संबंधित इतर तपशील उपलब्ध आहे. या पुरस्कारांची संदर्भातील कायदे आणि नियम यांची माहिती संकेतस्थळावर पुढील लिंकवर उपलब्ध आहे. https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx

 

* * *

Jaydevi PS/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1725987) Visitor Counter : 512