आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 साठी नेमलेल्या मंत्रीगटाची डॉ.हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली 28 वी बैठक
Posted On:
07 JUN 2021 8:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जून 2021
कोविड-19 साठी नेमलेल्या उच्च-स्तरीय मंत्रीगटाची 28 वी बैठक केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज नवी दिल्ली येथे पार पडली. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ.एस.जयशंकर, केंद्रीय गृह आणि शहरी व्यवहार(स्वतंत्र प्रभार) नागरी हवाई उड्डयन(स्वतंत्र प्रभार) आणि केंद्रीय वाणिज्य तसेच उद्योग राज्यमंत्री हरदीप एस पुरी, आणि केंद्रीय गृह व्यवहार राज्यमंत्री नित्यानंद राय तसेच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे हे देखील या बैठकीला उपस्थित होते.
कोविड-19 आजाराला प्रतिबंध करण्यासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांची थोडक्यात माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. “रोगमुक्ती दर सतत वाढत असून आज तो 93.94% आहे. गेल्या 24 तासांत केवळ 1 लाखहून थोड्या अधिक (1,00,636) नव्या कोविड बाधितांची नोंद झाली असून हा गेल्या 61 दिवसांतील नीचांक आहे. गेल्या 24 तासांत 1,74,399 रुग्ण कोविड मुक्त झाले असून आपल्या देशात सध्या मृत्यूदर 1.20% इतका आहे. एका दिवसांत कोविड मुक्त होणाऱ्यांची संख्या आज सलग 25 व्या दिवशी दैनंदिन पातळीवर नव्या कोविड बाधीतांपेक्षा जास्त राहिली आहे.”
सक्षम मंत्रीगट - 8 चे अध्यक्ष आणि केंद्रीय माहिती तसेच प्रसारण मंत्रालायचे सचिव अमित खरे यांनी देशातील दळणवळण विभागाच्या प्रयत्नांची थोडक्यात माहिती दिली. ह्या प्राणघातक आजाराशी लढा देताना “संपूर्णतः सरकार” दृष्टीकोन समोर ठेवून काम केल्याबद्दल खरे यांनी सर्व केंद्रीय मंत्रालये, सार्वजनिक क्षेत्रात्तील उपक्रम, स्वायत्त संस्था तसेच राज्य सरकारे, जिल्हा प्रशासन आणि जनसंपर्क संस्थांचे कौतुक केले. देशाच्या ग्रामीण तसेच आदिवासी भागावर लक्ष केंद्रित करण्याच्या गरजेवर भर देतानाच, कोविड योग्य वर्तणुकीचे पालन करण्याचा संदेश या भागांमध्ये पोहोचविण्यासाठी सामाजिक नेते आणि स्थानिक पातळीवरील प्रभावी व्यक्तिमत्वे, आघाडीवरील कर्मचारी, सहकारी संस्था, पंचायत राज प्रतिनिधी आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या कंपन्या, किरकोळ विक्रेते, व्यापारी संस्था, इत्यादींना सहभागी करून घ्यावे असे त्यांनी सांगितले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाच्या पत्र सूचना कार्यालय, आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादी माध्यम संस्था आणि त्यांची प्रादेशिक कार्यालये यांनी जनसामान्यांपर्यंत खरी माहिती पोहोचविण्यासाठी केलेल्या कामाचा देखील त्यांनी ठळकपणे उल्लेख केला.
* * *
M.Chopade/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1725155)
Visitor Counter : 254