Posted On:
07 JUN 2021 9:24PM by PIB Mumbai
- India reports 1 Lakh Daily New Cases in last 24 hours, lowest in 61 days
- India's Active Caseload further declines to 14,01,609
- 1,74,399 patients recovered during last 24 hours
- Recoveries continue to outnumber the Daily New Cases for the 25th consecutive day
- Recovery Rate increases to 93.94%
- Weekly Positivity Rate currently at 6.21%
- Daily positivity rate at 6.34%, less than 10% for 14 consecutive days.
- Testing capacity substantially ramped up – 36.6 cr total tests conducted
- 23.27 Cr. Vaccine Doses administered so far under Nationwide Vaccination Drive
|
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona
नवी दिल्ली/मुंबई, 7 जून 2021
जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून संवाद साधला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी आपल्या भारतीयांची लढाई सुरू आहे. जगातील इतर अनेक देशांप्रमाणेच भारत देखील या लढाईच्या दरम्यान खूप मोठ्या अडचणींना सामोरे गेला आहे.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
भारतात गेल्या 24 तासांच्या कालावधीत 1,00,636 नव्या कोविड बाधितांची नोंद झाली. गेल्या दोन महिन्यांतील रुग्णसंख्येचा हा नीचांक आहे. गेले सलग 11 दिवस देशात दैनंदिन पातळीवर नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 2 लाखांहून कमी आहे. “संपूर्णतः सरकार” दृष्टीकोनाअंतर्गत केंद्र सरकार आणि राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश सरकारे यांनी केलेल्या एकत्रित आणि शाश्वत प्रयत्नांचा हा परिणाम आहे.
भारतात सक्रीय कोविड बाधितांच्या संख्येत आता सतत घसरण दिसून येत आहे. देशातील सक्रीय कोविड बाधितांची संख्या आज सलग दुसऱ्या दिवशी 15 लाखांपेक्षा कमी म्हणजे 14,01,609 असल्याचे दिसून आले. ही रुग्णसंख्या सलग 7 व्या दिवशी 20 लाखांपेक्षा कमी आहे. गेल्या 24 तासांच्या कालावधीत सक्रीय रुग्णसंख्येत एकूण 76,190 ने घट झाली आणि देशातील सध्याची सक्रीय रुग्णसंख्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या केवळ 4.85% इतकी आहे.
भारतात अधिकाधिक लोक कोविड-19 आजारातून बरे होत असल्यामुळे देशात दैनंदिन पातळीवर नव्याने रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या सलग 25 व्या दिवशी नव्या बाधितांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. गेल्या 24 तासांत 1,74,399 रुग्ण कोविडमधून मुक्त झाले. गेल्या 24 तासांत दैनंदिन पातळीवर नव्याने संसर्ग होणाऱ्या रुग्णांपेक्षा रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या 73,763 ने अधिक होती.
महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत कोरोना आजार झालेल्यांपैकी 2,71,59,180 व्यक्ती कोविड -19 मधून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे एकूण रोगमुक्ती दर 93.94% झाला असून या दराचा चढता कल आता दिसून येत आहे.
गेल्या 24 तासांत देशात एकूण 15,87,589 चाचण्या करण्यात आल्या आणि भारताने आतापर्यंत एकूण 36 कोटी 60 लाखांहून अधिक (36,63,34,111) चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकीकडे देशात चाचण्यांचे प्रमाण वाढविले जात असतानाच दुसरीकडे पॉझिटीव्हिटी दरात सतत घसरण सुरु असल्याचे दिसते आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 6.34% इतका आहे. हा दर सलग 14 व्या दिवशी 10% हून कमी राहिला आहे. लसीकरणाच्या आघाडीवर बघितले तर, देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 23 कोटी 27 लाख मात्रा दिल्या गेल्या आहेत.
आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, देशात 32,68,969 सत्रांच्या आयोजनातून कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 23,27,86,482 मात्रा देण्यात आल्या आहेत.
इतर अपडेट्स :
महाराष्ट्र अपडेट:
महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधासाठी “ब्रेक द चेन” अंतर्गत पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी तयारी सुरू असताना, राज्य सरकारने नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये आजपासून सुरू होत असलेल्या प्रक्रियेसंदर्भात नव्याने अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार राज्य सरकारच्या निर्बंध शिथिल करण्याच्या पाच स्तरीय योजनेनुसार ठाणे आणि नवी मुंबईचा समावेश द्वितीय स्तरात करण्यात आला आहे. साप्ताहिक संसर्ग दर आणि ऑक्सिजन बेड्सवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या यांच्या आधारावर हे स्तर निश्चित करण्यात आले आहेत. 12 ते 18 या वयोगटातील बालकांसाठी लसीकरणाच्या चाचण्या नागपूर येथे सुरू झाल्या आहेत. चाचणीत सहभागी बालकांना या लसी स्नायूंमधून टोचल्या जात आहेत. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 230 मृत्यूंची नोंद झाल्यावर कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या एक लाखांच्या वर गेली आहे. आरोग्य वार्तापत्रानुसार 12,557 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 58,31,781 झाली आहे. गेल्या तीन महिन्यातील ही सर्वात कमी दैनंदिन रुग्णसंख्या आहे. मुंबईत 794 नव्या रुग्णांची नोंद झाली. 20 मृत्यू झाले आणि 833 रुग्ण बरे झाले.
गोवा अपडेट:
गोव्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 403 ने वाढून ती रविवारी 1,59,393 वर पोहोचली. 16 रुग्णांचा मृत्यू झाला तर 1449 रुग्ण बरे झाले. गोव्यामध्ये कोरोनामुळे 2760 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 1,49,479 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या गोव्यात 7154 उपचाराधीन रुग्ण आहेत. गेल्या 24 तासात 3022 नमुन्यांची तपासणी झाली असून एकूण चाचण्यांची संख्या 8,45,942 वर पोहोचली आहे.
Important Tweets
* * *
M.Chopade/D.Rane