आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
लसीकरणाबाबतच्या गैरसमजाचे निराकरण
तामिळनाडूला 2 जून 2021 पर्यंत 1 कोटीपेक्षा अधिक कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांचे वाटप
7.24 लाख मात्रा अजून राज्याकडे उपलब्ध
Posted On:
03 JUN 2021 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जून 2021
संपूर्ण सरकार ध्येयाने यावर्षी 16 जानेवारीपासून राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेश प्रभावी लसीकरण मोहिमेसाठी घेत असलेल्या प्रयत्नांना केन्द्र सरकार सहकार्य करत आहे.
तामिळनाडूत लसींची कमतरता असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. ते बिनबुडाचे आणि चुकीचे आहे.
तामिळनाडूत 2 जून 2021 रोजी पर्यंत, 1 कोटींपेक्षा अधिक लसीच्या मात्रांचे वाटप झाले आहे. यापैकी 93.3 लाख मात्रा देण्यात आल्या असून एकूण 7.24 लाख मात्रा अजूनही राज्याकडे उपलब्ध आहेत. केन्द्राकडून राज्याला जून 2021 च्या पहिल्या आणि दुसऱ्या पंधरवड्यात मोफत उपलब्ध केल्या जाणाऱ्या लसीच्या एकूण मात्रांबाबत तामिळनाडूला माहिती दिली गेली आहे. तामिळनाडूला 1 जून ते 15 जून 2021 याकाळात केन्द्राकडून एकूण 7. 48 लाख मात्रा उपलब्ध केल्या जाणार आहेत. तसेच 15 जून ते 30 जून 2021 या काळात अतिरिक्त 18. 36 लाख लसीच्या मात्रा पुरवल्या जातील.
कोविड प्रतिबंधक लसींची उपलब्धता आणि राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांद्वारे होणारे सरासरी लसीकरण या आधारावर लसींचा वाटप केले जाते.
वयोगट 18 ते 44 साठीच्या लसीकरणाला गती देण्यासाठीच नव्या खुल्या आणि व्यापक लसींच्या खरेदीबाबत ही तामिळनाडूबरोबर केन्द्राने संवाद साधला आहे. तिसऱ्या टप्प्यात 18 ते 44 वयोगटासाठी जून महिन्यात एकूण 16.83 लाख मात्रा उपलब्ध आहेत.
M.Chopade/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1724163)
Visitor Counter : 218