ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
सर्वाधिक असुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना एनएफएसए अर्थात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत शिधापत्रिका देण्याबाबत विशेष मोहीम सुरू करण्याच्या सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना केंद्राने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत
Posted On:
03 JUN 2021 10:35AM by PIB Mumbai
कोविड -19 महामारीच्या सध्याच्या परीस्थितीत राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत, देशातील सर्वात असुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्व पात्र व्यक्तींना, सुनिश्चित करणे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले आहे.
केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने दिनांक 2 जून 2021 रोजी सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना, राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची कक्षा लक्षात घेऊन , शहरी आणि ग्रामीण भागातील लोकसंख्येतील अत्यंत असुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची ओळख पटवून त्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत शिधापत्रिका देण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
या विभागाने राज्ये / केंद्रशासित प्रदेशांतील समाजातील असुरक्षित आणि दुर्बल घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे,ज्यात रस्त्यावर राहणाऱ्या व्यक्ती ,कचरा वेचणारे, फेरीवाले, रिक्षा चालक आणि इतर अशा लोकांना समाविष्ट केले आहे.एनएफएसए अंतर्गत पात्र व्यक्ती / कुटुंबे यांची ओळख पटवून त्यांचे कार्यान्वयन करण्याची जबाबदरी राज्य / केंद्रशासित प्रदेशांकडे असते.
याबाबत अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
***
Jaidevi PS/SP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1723977)
Visitor Counter : 246