PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 01 JUN 2021 8:18PM by PIB Mumbai

Coat of arms of India PNG images free download 

  • India reports lowest Daily New Cases of 1.27 Lakh in 54 days; declining trend in new cases maintained.
  • Recoveries continue to outnumber Daily New Cases for 19 successive days; Recovery Rate continues to increase, at 92.09% today.
  • Weekly Positivity Rate currently pegged at 8.64%. Daily Positivity Rate dips to 6.62%, less than 10% for 8 consecutive days.
  • Testing capacity substantially ramped up- 34.67cr tests total conducted.
  • 21.6 Cr. Vaccine Doses administered so far under Nationwide Vaccination Drive.

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 1 जून 2021

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

भारतात 54 दिवसातल्या सर्वात कमी 1.27 लाख दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद; नवे रुग्ण आढळण्याचा घटता कल कायम.

भारतातील सक्रीय रुग्णसंख्येत घट होऊन ती 18,95,520 पोहचली. 43 दिवसांनंतर रुग्णसंख्या 20 लाखाखाली. गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णसंख्येत 1,30,572 ची घट.

आतापर्यंत देशभरात एकूण 2,59,47,629 रुग्ण कोरोनामुक्त गेल्या 24 तासात 2,55,287 रुग्ण झाले बरे.

सलग 19 व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक. रुग्ण बरे होण्याच्या दरात वाढ कायम, आज 92.09%. साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर सध्या  8.64%. दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 6.62%वर घसरला, सलग 8 व्या दिवशी 10% पेक्षा कमी.

चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ- आतापर्यंत एकूण 34.67कोटी चाचण्या झाल्या. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत 21.6 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

 

इतर अपडेट्स :

 

महाराष्‍ट्र अपडेट:

कोविड -19 रूग्णसंख्येमध्ये सातत्याने घट झाल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने अत्यावश्यक दुकानांना पुढील 15 दिवस, सोमवार ते शुक्रवार या दरम्यान,एक दिवसाआड  सकाळी 7 ते दुपारी 2  ती खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. महाराष्ट्रात सोमवारी 15,077 नवीन कोविड -19 रुग्णांची नोंद झाली आहे, ही दिनांक 15 मार्च  नंतर नोंद झालेली  सर्वात कमी रूग्णसंख्या आहे, उपचाराधीन रूग्णांची संख्या 57,46,892 इतकी असून 184 रूग्ण मृत्युमुखी पडले आणि एकूण मृतांची संख्या 95,344 वर पोहोचली आहे.  सुमारे 33,000 रूग्णांना उपचारांनंतर  रुग्णालयातून घरी सोडण्यात आले ,त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 53,95,370 वर पोहोचली. राज्यात आता 2,53,367 सक्रिय रूग्ण आहेत. दरम्यान, मुंबई शहरात  666 नवीन रुग्णांची नोंद झाली आणि 29 मृत्यूची नोंद झाली असून,सक्रीय  रूग्णसंख्या 7,05,288 इतकी असून मृतांची संख्या 14,826 वर गेली आहे.

 

गोवा अपडेट:

गोव्यातील कोविड -19  रूग्णांच्या पॉझिटिव्हिटी चे प्रमाण आता 19 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. राज्याच्या कोविड-19 महामारी तज्ज्ञ समितीचे प्रमुख डॉ. शिवानंद बांदेकर म्हणाले, की गेल्या आठवड्यापर्यंत किनारपट्टीच्या राज्यात म्यूकरमायकोसिसचा (बुरशीजन्य)संसर्ग झालेले एकूण 12  रूग्ण नोंदवले गेले आहेत आणि त्यानंतर काळ्या  बुरशीच्या संसर्गाचे कोणतेही नवीन रूग्ण अद्याप आढळलेले नाही. गोवा सरकारने कोविड -19 लसीकरणास  पात्र ठरण्यासाठी, अग्रभागी लढणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या (FLWs)व्याख्येत टॅक्सी ड्राइवर, मोटारसायकल चालक,नाविक (सीफेअरर्सना) यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

* * *

M.Chopade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1723506) Visitor Counter : 173