रसायन आणि खते मंत्रालय

देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी सरकारने सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे देशभरातील कोविड-19 उपचाराच्या औषधांचा पुरवठा-मागणी यांचे संतुलन झाले आहे


रेमडेसिव्हिरच्या उत्पादनात दहा पट वाढ

राज्ये / केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थांना दिनांक 11 मे - 30 मे 2021या कालावधीत अ‍ॅम्फोटेरिसिन बी च्या 2,70,060 कुप्या वितरीत

प्रविष्टि तिथि: 01 JUN 2021 6:19PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जून 2021


केंद्रीय मंत्री श्री. डी.व्ही. सदानंद गौडा म्हणाले की, देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी सरकारने सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे देशभरातील कोविड उपचाराच्या  औषधांचा पुरवठा-मागणी  यांचे संतुलन  झाले आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले, की 21 एप्रिल ते 30 मे 2021 या कालावधीत एकूण 98. 87 लाख रेमडेसव्हिरच्या कुप्या  राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थांना देण्यात आल्या आहेत. मागणीच्या तुलनेत रेमडेसव्हिरच्या उत्पादनात दहा पटीने वाढ झाली आहे. या वेगाने झालेल्या उत्पादनामुळे आम्ही जून अखेरपर्यंत  91 लाख कुप्यांचा पुरवठा करण्याचा विचार करीत आहोत, असेही ते पुढे म्हणाले. त्यांनी पुढे अशी माहिती दिली, की सिप्ला या कंपनीने एप्रिल 25-30 मे  2021 पर्यंत टोसिलीझुमॅबच्या 400 मिलीग्रामच्या  11,000 कुप्या आणि 80 मिलीग्रामच्या 50,000 कुप्या आयात केल्या आहेत. याव्यतिरिक्त, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मे महिन्यामध्ये देणगीच्या माध्यमातून 400 मिलीग्रामच्या 1002 कुप्या आणि 80 मिलीग्रामच्या 50,024 कुप्या  प्राप्त केल्या आहेत.  याशिवाय 80 मिलीग्रामच्या 20,000 कुप्या  आणि 200 मिलीग्रामच्या 1000 कुप्या   येत्या जून महिन्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

दिनांक 11 मे ते 30 मे 2021 पर्यंत अ‍ॅम्फोटेरिसिन बी च्या सुमारे 2,70,060 कुप्या राज्य / केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थांना वितरीत  केल्या गेल्या असल्याची,माहिती श्री गौडा यांनी दिली आहे. मे महिन्यात  उत्पादकांनी राज्यांकडे सुपूर्द केलेल्या 81,651 कुप्यांच्या पुरवठ्याव्यतिरिक्त हा पुरवठा झाला आहे.

 

* * *

M.Chopade/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1723477) आगंतुक पटल : 265
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam