श्रम आणि रोजगार मंत्रालय

कोविड -19 मुळे निधन झालेल्या कामगारांच्या अवलंबितांना श्रम मंत्रालयाकडून मोठा सामाजिक सुरक्षा दिलासा जाहीर

Posted On: 30 MAY 2021 5:34PM by PIB Mumbai

 

कोविड -19 महामारीमुळे मृत्यूच्या वाढत्या घटनांनी कामगारांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या भवितव्याविषयी वाटणारी भीती व चिंता दूर करण्यासाठी श्रम व रोजगार मंत्रालयाने ईएसआयसी व ईपीएफओ योजनांच्या माध्यमातून अतिरिक्त फायदे जाहीर केले आहेत. नियोक्ताला कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय कामगारांना वर्धित सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सध्या ईएसआयसी अंतर्गत विमा उतरवलेल्या व्यक्तींसाठी (आयपी) नोकरीच्या ठिकाणी दुखापतीमुळे मृत्यू झाल्यास किंवा विमा उतरवलेली व्यक्ती काम करण्यास अक्षम झाल्यास त्या कर्मचाऱ्याच्या सरासरी दैनंदिन मजुरीच्या 90% इतके निवृत्तीवेतन त्याच्या पत्नीला आणि विधवा आईला आयुष्यभरासाठी आणि मुलांना त्यांच्या वयाच्या पंचविशी पर्यंत उपलब्ध असेल. मुलींना त्यांच्या लग्नापर्यंत हा लाभ उपलब्ध आहे.

ईएसआयसी योजनेंतर्गत विमा उतरवलेल्या व्यक्तींच्या (आयपी) कुटुंबांना आधार देण्यासाठी, अशा व्यक्तींनी जर कोविड रोगाचे निदान होण्यापूर्वी आणि त्या रोगामुळे मृत्यू होण्याआधी ईएसआयसीच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये नोंदणी केली असल्यास त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंब सदस्यांना खालील पात्रता अटींच्या अधीन राहून तोच फायदात्याच प्रमाणात मिळेल जो नोकरीच्या ठिकाणी दुखापतीमुळे मृत्यू झाल्यास किंवा विमा उतरवलेली व्यक्ती काम करण्यास अक्षम झाल्यास त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना मिळतो:

अ. कोविड रोगाने मृत्यूचे निदान होण्यापूर्वी किमान तीन महिने अगोदर विमा उतरवलेल्या व्यक्तींनी (आयपी) ईएसआयसी ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी केलेली असावी.

ब. कोविड रोगाचे निदान होण्यापूर्वी एका वर्षाच्या कालावधीत आयपी कमीतकमी 78 दिवसांसाठी तो वेतनावर नियुक्त असावा.

अधिक माहितीसाठी  https://www.pib.gov.in/PressReleseDetail.aspx?PRID=1722912  वर क्लिक करा.

***

S.Thakur/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1722934) Visitor Counter : 240