नागरी उड्डाण मंत्रालय
एनपीएनटी अनुरूप ड्रोन संचलनासाठी 166 अतिरिक्त हरित क्षेत्र स्थळे मंजूर
Posted On:
29 MAY 2021 5:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 मे 2021
देशात ड्रोन संचालन अधिक सुविधेचे सुरळीत करून त्याला चालना देण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने एनपीएनटी (नो परमिशन नो टेक ऑफ) अनुरूप ड्रोन संचलनासाठी 166 अतिरिक्त हरित क्षेत्र स्थळांना मंजुरी दिली आहे. मंजुरी मिळालेल्या क्षेत्रांमध्ये जमीन स्तरापासून 400 फुटांपर्यंत ड्रोन वापरासाठी परवानगी आहे. यापूर्वी मंजुरी दिलेल्या 66 हरित क्षेत्र स्थळां व्यतिरिक्त ही क्षेत्रे आहेत. मंजुरी असलेल्या हरित क्षेत्र स्थळांची यादी डिजिटल स्काय प्लॅटफॉर्मवर (https://digitalsky.dgca.gov.in) उपलब्ध आहे.
डीजीसीएनुसार “एनपीएनटी किंवा “परवानगी नाही - उड्डाण नाही" अंतर्गत, प्रत्येक दूरस्थ संचालित विमानाला (नॅनो वगळता) भारतात संचालनापूर्वी डिजिटल स्काई प्लॅटफॉर्मद्वारे वैध परवानगी प्राप्त करावी लागते. या आराखड्यामुळे वापरकर्त्यांना दूरस्थ संचालित विमानासाठी, राष्ट्रीय मानवरहित वाहतूक व्यवस्थापनासाठी असलेल्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. मंजुरी असलेल्या हरित क्षेत्रात उड्डाण करण्यासाठी केवळ डिजिटल स्काई पोर्टल किंवा अॅपद्वारे उड्डाणाची वेळ आणि स्थान सूचित करणे आवश्यक आहे.
अतिरिक्त हरित क्षेत्र स्थळांमध्ये ड्रोन उड्डाणे 12 मार्च 2021 रोजीच्या मानवरहित विमान प्रणाली (UAS) नियम 2021 आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या इतर संबंधित आदेश/मार्गदर्शक तत्त्वांचे अनुपालन करतील.
मंजुरी मिळालेल्या हरित क्षेत्र स्थळांची राज्यांनुसार यादी :
State
|
Number of sites
|
Andhra Pradesh
|
04
|
Chhattisgarh
|
17
|
Gujarat
|
02
|
Jharkhand
|
30
|
Karnataka
|
06
|
Madhya Pradesh
|
24
|
Maharashtra
|
22
|
Odisha
|
30
|
Punjab
|
01
|
Rajasthan
|
06
|
Tamil Nadu
|
07
|
Telangana
|
09
|
Uttar Pradesh
|
08
|
मंजुरी मिळालेल्या हरित क्षेत्र स्थळांच्या यादीसाठी इथे क्लिक करा
* * *
S.Tupe/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1722704)
Visitor Counter : 291