पंतप्रधान कार्यालय
यास चक्रीवादळामुळे उदभवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी घेतली बैठक
यास चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफची 106 पथके तैनात करण्यात आली
सामान्य जनजीवन लवकरात लवकर पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करा - पंतप्रधान
Posted On:
27 MAY 2021 6:04PM by PIB Mumbai
यास चक्रीवादळामुळे उदभवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. या बैठकीत सज्जता, नुकसानीचे मूल्यांकन आणि संबंधित बाबींच्या विविध पैलूंचे विस्तृत सादरीकरण अधिकाऱ्यांनी केले.
पश्चिम बंगाल/ओदिशा राज्यात प्रत्येकी 46 पथकांसह एनडीआरएफची सुमारे 106 पथके तैनात करण्यात आली होती आणि त्यांनी 1000 हून अधिक लोकांची सुटका केली आणि रस्त्यावर पडलेली आणि वाहतुकीला अडथळे आणणारी 2500 हून अधिक झाडे/खांब बाजूला करत मार्ग मोकळा केला. नौदल आणि हवाई दल दक्ष असताना, लष्कर आणि तटरक्षक दल या संरक्षण दलांच्या जवानांनी अडकलेल्या माणसांची सुटका केली, यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली.
"यास" चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा राज्ये घेत आहेत. हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार चक्रीवादळग्रस्त भागात राज्ये आणि केंद्राच्या संस्थांनी प्रभावीपणे जनतेशी संवाद साधला, वेळेत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले, त्यामुळे जीवीतहानी किमान राखता आली. यासाठी वादळाच्या अचूक अंदाजाचे आभार मानायला हवेत. त्याचवेळी पूरामुळेही नुकसान झाले आहे, त्याचेही मुल्यांकन सुरु आहे. वादळग्रस्त भागांपैकी अनेक ठिकाणी वीज आणि दूरसंचार सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.
प्रभावित भागातल्या आव्हानांचा सामना करणाऱ्या राज्ये आणि केंद्रीय संस्थांच्या प्रभावी, कार्यतत्पर भूमिकेची पंतप्रधानांनी दखल घेतली. प्रभावित भागातले जनजीवन पूर्वपदावर यावे, ते सुरळीत व्हावे, तिथल्या जनतेला दिलासा मिळावा याची काळजी घेण्याची सूचनाही पंतप्रधानांनी संबंधितांना दिल्या.
पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, गृह सचिव, ऊर्जा सचिव, दूरसंचार सचिव आणि महासंचालक भारतीय हवामान विभाग (आयएमडी) व अन्य महत्त्वपूर्ण अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.
***
S.Tupe/S.Chavan/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1722194)
Visitor Counter : 189
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam