रेल्वे मंत्रालय

ऑक्सीजन एक्सप्रेसच्या माध्यमातून आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक 1142 मेट्रीक टनापेक्षा अधिक प्राणवायूची मदत पोचवण्यात आली


देशभरातील 14 राज्यांमधे एका महिन्यात 16000 मेट्रीक टन द्रवरुप वैदयकीय प्राणवायू भारतीय रेल्वेने पोहचवला

247 ऑक्सीजन एक्सप्रेसनी 977 टँकर्सच्या सहाय्याने 14 राज्यातील आतापर्यंतचा आपला प्रवास केला

Posted On: 24 MAY 2021 5:05PM by PIB Mumbai

 

सर्व अडथळ्यांवर मात करत आणि नवे उपाय शोधत देशभरातील विविध राज्यात द्रवरूप वैदयकीय प्राणवायू पोहचवण्याचा दिलासादायक प्रवास भारतीय रेल्वेने सुरुच ठेवला आहे. आतापर्यंत भारतीय रेल्वेने 16023 मेट्रीक टन द्रवरूप वैदयकीय प्राणवायू 977 पेक्षा अधिक टँकर्समधून देशातील विविध राज्यात पोहचवला आहे.

विविध राज्यांना दिलासा देत 247 ऑक्सीजन एक्सप्रेसनी आपला हा प्रवास केला आहे. हे पत्रक प्रसिद्ध होत असताना 12 ऑक्सीजन एक्सप्रेस 50 टँकर्समधून 920 मेट्रीक टन द्रवरूप वैदयकीय प्राणवायू घेऊन प्रवास करत आहेत.

ऑक्सीजन एक्सप्रेसच्या माध्यमातून आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक 1,142 मेट्रीक टनापेक्षा अधिक प्राणवायूची मदत काल पोचवण्यात आली. या आधीची सर्वोत्तम कामगीरी 20 मे 2021 रोजी

1,118 मेट्रीक टन इतकी होती. विशेषत्वाने नमूद करावेसे वाटते की ऑक्सीजन एक्सप्रेसचा हा प्रवास 30 दिवसांपूर्वी 24 एप्रिल रोजी सुरु झाला. पहिल्या एक्सप्रेसमधून 126 मेट्रीक टन प्राणवायू महाराष्ट्रात पोहचवण्यात आला.

अवघ्या एका महिन्यातच भारतीय रेल्वेने देशभरातील 14 राज्यांमधे 16,000 मेट्रीक टनांहून  अधिक द्रवरुप वैदयकीय प्राणवायू  पोहचवला आहे.

ऑक्सीजन एक्सप्रेसच्या माध्यमातून प्राणवायूचा दिलासा देण्यात आलेली 14 राज्ये पुढील प्रमाणे: उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र,मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश,राजस्थान, तामिळनाडू, हरियाणा, तेलंगणा, पंजाब, केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि आसाम.

हे पत्रक प्रसिद्ध होईपर्यंत, 614 मेट्रीक टन प्राणवायू महाराष्ट्रात पोहचवण्यात आला, उत्तरप्रदेशात सुमारे 3649 मेट्रीक टन, मध्य प्रदेशात 633 MT, दिल्लीत 4600 MT, हरियाणात 1759 MT , राजस्थानात 98 MT, कर्नाटकात 1063 MT, उत्तराखंडात 320 MT, तामिळनाडूत 1024 MT, आंध्रप्रदेशात 730 MT, पंजाबमधे 225 MT, केरळात 246 MT,  तेलंगणात 976 MT आणि आसाममधे 80 मेट्रीक टन प्राणवायू पोहचवण्यात आला.

इतर मालवाहतुकीच्या वेगावर परिणाम होऊ न देता ही मोहीम राबवली आहे. प्राणवायू वाहून नेणे ही मोठी जोखमीची कामगीरी आहे. याबाबतची आकडेवारी सातत्याने अद्यावत केली जाते. आणखी काही  ऑक्सीजन एक्सप्रेसचा प्रवास आज रात्री  सुरु होणे अपेक्षित आहे.

***

Jaydevi PS/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1721296) Visitor Counter : 292