PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 21 MAY 2021 9:05PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली/मुंबई 21 मे 2021

 

 

  • Nationwide Cumulative Vaccination Coverage exceeds 19 Crore
  • India Conducts Highest ever 20.61 Lakh Tests in the last 24 hours; Sets Another New Record
  • Daily Positivity Rate Declines to 12.59%
  • PM interacts with doctors and officials of Varanasi
  • Countrywide “AYUSH COVID -19 Counselling Helpline” is now operational

 

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

 

PRESS INFORMATION BUREAU

MINISTRY OF INFORMATION AND BROADCASTING

GOVERNMENT OF INDIA

 

 

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती

देशव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत भारताने लसीच्या 19 कोटीपेक्षा जास्त (19,18,79,503) मात्रा देत लसीकरण अभियानामध्ये आज नवा टप्पा गाठला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण 27,53,883 सत्रांद्वारे 19,18,79,503 मात्रा देण्यात आल्या आहेत.

यामध्ये 97,24,339 आरोग्य कर्मचारी (पहिली मात्रा ), 66,80,968 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा ), 1,47,91,600 फ्रंट लाईन कर्मचारी (पहिली मात्रा), 82,85,253 फ्रंट लाईन कर्मचारी (दुसरी मात्रा), 18-44 वयोगटामधले 86,04,498 लाभार्थी (पहिली मात्रा) 45 ते 60 वयोगटातल्या 5,98,35,256 (पहिली मात्रा ), आणि 95,80,860 लाभार्थी (दुसरी मात्रा) 60 वर्षावरील 5,62,45,627 लाभार्थी (पहिली मात्रा ), 1,81,31,102  (दुसरी मात्रा)यांचा समावेश आहे.

देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 66.32% मात्रा दहा राज्यात देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात 20.61 लाखापेक्षा जास्त चाचण्या करत भारताने एका दिवसात सर्वाधिक चाचण्या करण्याचा नवा विक्रम केला आहे.

दैनंदिन पॉझीटीव्हिटी दरात 12.59% पर्यंत घट झाली आहे.

भारतात सलग आठव्या दिवशी दैनंदिन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासात 3,57,295 रुग्ण कोरोनातून बरे झाले.

बरे झालेल्यांची एकूण संख्या आज 2,27,12,735 झाली. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर वाढून 87.25% झाला आहे.

नुकत्याच बरे झालेल्यांपैकी 74.55%  हे दहा राज्यातले आहेत.

आणखी एका सकारात्मक घडामोडीत सलग पाचव्या दिवशी दैनंदिन रुग्णांची संख्या 3 लाखापेक्षा कमी नोंदवली गेली.

गेल्या 24 तासात 2,59,551 नव्या रुग्णांची नोंद झाली.

नव्या रुग्णांपैकी 76.66% रुग्ण, दहा राज्यांमध्ये आहेत.

तामिळनाडूत सर्वात जास्त म्हणजे 35,579 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर केरळमध्ये 30,491 नव्या रुग्णांची नोंद झाली.

भारतातली एकूण उपचाराधीन रुग्ण संख्या आज 30,27,925 पर्यंत घटली आहे.

गेल्या 24 तासात  उपचाराधीन रुग्ण संख्येत 1,01,953 ची घट झाली आहे.

देशातल्या उपचाराधीन रुग्णांपैकी 69.47% रुग्ण 8  राज्यात आहेत.

 

इतर अपडेटस्

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/WhatsAppImage2021-05-21at1.47.26PMKH7M.jpeg

महाराष्ट्र अपडेट्स :-

महाराष्ट्रात मुंबई महानगरपालिकेने गुरुवारी मुंबई उपनगरात कांदिवली परिसरातील लसीकरण केंद्रात आणखी एक लसीकरण मोहीम सुरु केली.  दरम्यान, राज्य सरकारच्या ताज्या मार्गदर्शक सूचनांमध्ये, म्युकरमायकोसिसच्या अनुषंगाने, रुग्णालयात दाखल कोविड -19 रुग्णांची घरी सोडण्यापूर्वी किंवा सोडल्यानंतर तातडीने मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यात यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये स्टेरॉईड, ऑक्सिजन थेरपी घेतलेल्या आणि रुग्णालयाच्या अतिदक्षता विभाग (आयसीयू) मध्ये उपचार सात दिवस घेतलेल्या रुग्णांचा यात समावेश करण्यात आला आहे.

 

गोवा अपडेट्‌स:-

गोवा सरकारने आज राज्यव्यापी संचारबंदी 31मे पर्यंत वाढवली. राज्यातील वाढते कोविड रुग्ण आणि कोविडशी निगडित मत्यू याचा विचार करताराज्य सरकारने 10 मे ते 23 मे या कालावधीत 15 दिवसांची राज्यव्यापी संचारबंदी लागू केली होती. संचारबंदीच्या कालावधीत सर्व आवश्यक वस्तूंची दुकाने  सकाळी 7 ते दुपारी 1 या वेळेत खुली असतील. राज्यात अपेक्षित कोविडच्या तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने तयारी करण्यासाठी गोवा सरकारने आज एका कृती दलाची स्थापना केली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या 15 सदस्यांच्या कृती दलामध्ये डॉक्टरांसह 15 सदस्य असतील.

PIB FACT CHCEK

 

***

M.Chopade/S.ChavanP.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1720756) Visitor Counter : 161


Read this release in: English , Urdu , Hindi , Gujarati