रेल्वे मंत्रालय

ऑक्सिजन एक्सप्रेसनी एका दिवसातील सर्वाधिक 1118 मे.टन ऑक्सिजन केला वितरीत


आतापर्यंत 814 टँकर आणि 208 ऑक्सिजन एक्सप्रेसमधून एकूण 13319 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा

Posted On: 21 MAY 2021 4:11PM by PIB Mumbai

 

सर्व अडथळ्यांवर मात करून आणि नवीन उपाय शोधून भारतीय रेल्वे द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन (एलएमओ) देशभरातील विविध राज्यात पोहचवून दिलासा देण्याचा  प्रयत्न करत आहे. आतापर्यंत, भारतीय रेल्वेने देशातील विविध राज्यांमध्ये 814 पेक्षा जास्त टँकरद्वारे सुमारे 13319 मेट्रिक टन एलएमओ वितरीत केला आहे.

हे नमूद करण्यात येते की 208 ऑक्सिजन एक्सप्रेसने आतापर्यंत आपला प्रवास पूर्ण केला आहे आणि विविध राज्यांना दिलासा दिला आहे.

आणखी 13 ऑक्सिजन एक्प्रेस 1018  मे.टन पेक्षा जास्त एलएमओसह धावत आहेत.

ऑक्सिजन एक्सप्रेस गेल्या काही दिवसांपासून दररोज सुमारे 800 मे.टन एलएमओ देशभरात पोहचवत आहेत.

ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, हरियाणा, तेलंगणा, पंजाब, केरळ, दिल्ली आणि उत्तर प्रदेश अशा 13 राज्यात ऑक्सिजन मदत पोहोचली आहे .

आतापर्यंत महाराष्ट्रात 614 मेट्रिक टन ऑक्सिजन, उत्तर प्रदेशात सुमारे 3338 मेट्रिक टन, मध्य प्रदेशात 521 मे.टन, दिल्लीत 4110 मे टन, हरियाणामध्ये 1619 मेट्रिक टन, राजस्थानमध्ये 98 मेट्रिक टन, कर्नाटकात 714  मेट्रिक टन, उत्तराखंडमध्ये 320 मेट्रिक टन, तामिळनाडूमध्ये 649 मेट्रिक टन, आंध्र प्रदेशात 292 मेट्रिक टन, पंजाबमध्ये 153 मेट्रिक टन, केरळमध्ये 118  मेट्रिक टन आणि तेलंगणामध्ये 772 मेट्रिक टन ऑक्सिजन वितरित करण्यात आला आहे.

ऑक्सिजन एक्सप्रेसने 27 दिवसांपूर्वी 24 एप्रिल रोजी महाराष्ट्रात 126 मे.टन ऑक्सिजन पुरवठा करून आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती.

ऑक्सिजन मदत शक्य तितक्या लवकर पोहचावी यासाठी  रेल्वेमार्ग खुले ठेवण्यात आले आहेत व उच्च दक्षता ठेवली गेली आहे, जेणेकरून ऑक्सिजन एक्सप्रेस वेगाने जाईल.

इतर मालवाहतुकीची गती मंदावणार नाही अशा प्रकारे हे सर्व करण्यात येत आहे.

***

S.Tupe/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1720606) Visitor Counter : 227