PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 20 MAY 2021 6:15PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002XWYZ.png https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001G5AG.jpg

  • Daily Recoveries Outnumber Daily New Cases for 7th Consecutive Day
  • PM interacts with state and district officials on the COVID-19 situation
  • More than 21 crore vaccine doses provided to States/UTs
  • On Mission Mode, Around 200 Oxygen Expresses have completed their journey so far

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image00459Y0.jpg

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005IQIL.jpg

नवी दिल्‍ली/मुंबई, 20 मे 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  कोविड–19 परिस्थितीबाबत राज्य व जिल्हा अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या संवादा दरम्यान, अधिकाऱ्यांनी कोविड -19  विरुद्धच्या लढाईत पंतप्रधानांनी केलेल्या नेतृत्वाबद्दल त्यांचे आभार मानले. अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना आपापल्या जिल्ह्यातील सुधारत असलेल्या कोविड परिस्थितीची  माहिती दिली.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

भारतात सलग सातव्या दिवशी,  बरे होणाऱ्या रुग्णांची दैनंदिन संख्या दैनंदिन नवीन रुग्णांपेक्षा अधिक  असून गेल्या 24 तासांत 3,69,077 रुग्ण बरे झाले. भारतात बरे झालेल्या रुग्णांची  एकूण  संख्या आज 2,23,55,440 वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर  वाढून 86.74% पर्यंत पोहोचला आहे. नवीन बरे झालेल्या रुग्णांपैकी 75.11% रुग्ण  दहा राज्यातील आहेत.

आणखी एका सकारात्मक घडामोडीत  सलग तिसऱ्या दिवशी देशात 3 लाखांपेक्षा कमी नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 2,76,110 नवीन रुणांची नोंद झाली. गेल्या 24 तासांत नोंद झालेल्या रुग्णांपैकी  77.17 % रुग्ण दहा राज्यांमधील आहेत. तमिळनाडूमध्ये सर्वाधिक नवीन 34,875 रुग्ण आढळले आहेत, त्याखालोखाल कर्नाटकात   34,281 नवीन रूग्ण आढळले आहेत.

देशातील उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या कमी होऊन 31,29,878 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासांत त्यात 96,841 ने घट झाली आहे. आता देशातील एकूण पॉझिटिव्ह रूणांपैकी 12.14 टक्के  रूग्ण उपचाराधीन  आहेत. देशाच्या एकूण उपचाराधीन  रुणांपैकी  69.23 टक्के  रुग्ण 8 राज्यातील आहेत.

गेल्या 24 तासांत 20.55 लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या (ही भारतातील एका दिवसात आतापर्यंत सर्वात जास्त चाचण्याची  संख्या आहे), असून भारताने कालचा आपला विक्रम मोडला आहे. दैनंदिन पॉझीटिव्हिटी दर घसरून 13.44 टक्क्यांवर  आला आहे. गेल्या 24 तासात देशात  20,55,010  लाख चाचण्या घेण्यात आल्या.

राष्ट्रीय मृत्यू दर दर सध्या 1.11% आहे. गेल्या 24 तासांत 3,874 मृत्यूची नोंद झाली. नवीन मृत्यूंमध्ये दहा राज्यांमधील 72.25 टक्के मृत्यूंचा  समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 594 मृत्यू झाले आहेत. त्याखालोखाल कर्नाटकमध्ये  468 मृत्यू झाले.

देशव्यापी लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत  देशातील कोविड -19 लसींच्या एकूण मात्रांची संख्या आज 18.70  कोटींवर पोहोचली आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण  18,70,09,792 लसींच्या मात्रा 27,31,435 सत्रांद्वारे देण्यात आल्या आहेत. यामध्ये 96,85,934 आरोग्य कर्मचारी (पहिली मात्रा), 66,67,394 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा), 1,46,36,501 आघाडीवर काम करणारे कर्मचारी (पहिली मात्रा), 82,56,381 आघाडीवर काम करणारे कर्मचारी (दुसरी मात्रा ),18-44 वयोगटातील 70,17,189  लाभार्थी (पहिली मात्रा),45 ते 60 वयोगटातील  5,83,47,950  (पहिली मात्रा) आणि  94,36,168  (दुसरी मात्रा ) तर 45 ते 60 वर्षे वयोगटातील  5,49,36,096 पहिली मात्रा तर, 1,80,26,179 लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली. देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 66.61% मात्रा दहा राज्यांमध्ये दिल्या आहेत.

 

इतर अपडेट्स :

 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image006TC2Y.jpg

 

* * *

Jaydevi PS/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1720355) Visitor Counter : 138