आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड 19 लसींबाबत ताजी माहिती
राज्य / केंद्र शासित प्रदेशांना 21 कोटींहून अधिक लसींच्या मात्रा पुरवण्यात आल्या आहेत
राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडे अद्यापही 1.97 कोटी पेक्षा अधिक मात्रा उपलब्ध
Posted On:
20 MAY 2021 6:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मे 2021
लसीकरण हा केंद्र सरकारच्या महामारीच्या नियंत्रण आणि व्यवस्थापनाच्या (चाचणी, ट्रॅक, उपचार आणि कोविड योग्य वर्तणूक यांचा समावेश असलेल्या) व्यापक एकात्मिक रणनीतीचा एक अविभाज्य स्तंभ आहे. केंद्र सरकार, विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड लस मोफत देऊन देशव्यापी लसीकरण मोहिमेत योगदान देत आहे.
केंद्र सरकार देखील राज्ये / केंद्रशासित प्रदेशांद्वारे लसीची थेट खरेदी सुलभ करत आहे.
कोविड -19 लसीकरणाच्या उदार आणि गतीशील टप्प्यातील रणनीतीची अंमलबजावणी दिनांक 1 मे 2021 पासून सुरू झाली आहे. या धोरणाच्या अंतर्गत प्रत्येक महिन्यात केंद्रीय औषध प्रयोगशाळेने (CDL) मान्यता दिलेल्या, एकूण उत्पादकांच्या लसींपैकी 50% मात्रा सरकारकडून खरेदी केल्या जातील. पूर्वी निश्चित केल्यानुसार राज्य सरकारांना या मात्रा पूर्णपणे मोफत उपलब्ध करुन दिल्या जातील.
केंद्र सरकारने आतापर्यंत राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना विनामूल्य आणि थेट खरेदीद्वारे 21 कोटींपेक्षा जास्त (21,07,31,130) लसींच्या मात्रा प्रदान केल्या आहेत. यापैकी वाया गेलेल्या लसींसह 19,09,60,575 मात्रा (आज सकाळी 8 वाजता प्राप्त झालेल्या उपलब्ध आकडेवारीनुसार) दिल्या गेल्या आहेत.
सुमारे 2 कोटी (1,97,70,555) कोविड लसींच्या मात्रा अद्याप राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध आहेत.
याव्यतिरिक्त, जवळपास 26 लाख (25,98,760) लसींच्या मात्रा वितरीत करणे प्रस्तावित असून पुढील 3 दिवसांत त्या राज्य / केंद्रशासित प्रदेशांना प्राप्त होतील.
* * *
Jaydevi PS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1720345)
Visitor Counter : 244