पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी ग्यानी जोगिंदरसिंग वेदांती यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे

Posted On: 15 MAY 2021 11:45PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्यानी जोगिंदरसिंग वेदांती जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले," ग्यानी जोगिंदरसिंग वेदांती  विद्वान आणि विनम्र होते. त्यांचे जीवन हे निस्वार्थी मानवी सेवेचे प्रत्यक्ष रुप होते.त्यांनी क्षमाशील आणि  मैत्रिपूर्ण समाज निर्माण करण्यासाठी कार्य  केले. त्यांच्या निधनाने मला दु:ख झाले आहे. त्यांचे कुटुंबीय आणि प्रशंसंकांप्रती मी सहवेदना व्यक्त करत आहे.

 

***

Jaidevi PS/Sushama K/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1720202) Visitor Counter : 121