PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
19 MAY 2021 8:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 19 मे 2021
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
भारतात सलग सहाव्या दिवशी, दैनंदिन बरे होणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या दैनंदिन नवीन रुग्णांपेक्षा अधिक झाली असून गेल्या 24 तासांत 3,89,851 रुग्ण बरे झाले.
भारतात कोविडमुक्त झालेल्याची एकूण संख्या आज 2,19,86,363 वर पोहोचली आहे. बरे होण्याचा राष्ट्रीय दर 86.23% पर्यंत पोहोचला आहे.
नवीन बरे झालेल्या रुग्णांपैकी 74.94% दहा राज्यातील आहेत.
भारतात सलग तिसऱ्या दिवशी 3 लाखांपेक्षा कमी नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासांत 2,67,334 नवीन रुणांची नोंद झाली.
गेल्या 24 तासांत नोंद झालेल्या रुग्णांपैकी 74.46% रुग्ण दहा राज्यांमधील आहेत. तमिळनाडूमध्ये सर्वाधिक नवीन 33,059,रुग्ण आढळले आहेत, त्याखालोखाल केरळमध्ये 31,337 नवीन रूग्ण आढळले आहेत.
गेल्या 24 तासांत त्यात 1,27,046 ने घट झाली आहे.
आता देशातील एकूण पॉझिटिव्ह रूणांपैकी 12.66% रूग्ण सक्रीय आहेत.
देशाच्या एकूण सक्रिय रुणांपैकी 69.02% रुग्ण 8 राज्यातील आहेत.
गेल्या 24 तासांत 20 लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या (ही भारतातील एका दिवसात आतापर्यंत सर्वात जास्त चाचण्या झालेली संख्या आहे), तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर घसरून 13.31% वर आला आहे.
गेल्या 24 तासात देशात 20.08 लाख चाचण्या घेण्यात आल्या असून हा जागतिक विक्रम आहे.
आतापर्यंत देशभरात 32 कोटीहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
एकत्रित पॉझिटिव्हिटी दर 7.96% आहे.
देशभरातील लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत देशातील कोविड -19 लसींच्या एकूण मात्रांची संख्या आज 18.58 कोटींवर पोहोचली आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण 18,58,09,302 लसींच्या मात्रा 27,10,934 सत्रांद्वारे देण्यात आल्या आहेत. यामध्ये 96,73,684 आरोग्य कर्मचारी (पहिली मात्रा), 66,59,125 एचसीडब्ल्यू (दुसरी मात्रा), 1,45,69,669 आघाडीवर काम करणारे कर्मचारी (पहिली मात्रा), 82,36,515 आघाडीवर काम करणारे कर्मचारी (दुसरी मात्रा ),18-44 वयोगटातील 64,77,443 लाभार्थी ( पहिली मात्रा),45 ते 60 वयोगटातील 5,80,46,339 (पहिली मात्रा ) आणि 93,51,036 (दुसरी मात्रा ) तर 45 ते 60 वर्षे वयोगटातील 5,48,16,767 पहिली मात्रा तर, 79,78,724 लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा देण्यात आला.
इतर अपडेट्स :
महाराष्ट्र अपडेट्स :-
म्युकोरमायकॉसिसच्या रुग्णांवर 'महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअन्तर्गत' उपचार केले जातील, असे महाराष्ट्र शासनाने म्हटले आहे. म्युकोरमायकॉसिसच्या उपचारांसाठी मोठा खर्च येतो. त्यामुळे, 'महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअन्तर्गत' पात्र रुग्णांवर ती योजना लागू असणाऱ्या रुग्णालयांत उपचार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
महाराष्ट्रात मंगळवारी कोविड-19 चे 28,438 नवीन रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनारुग्णांची एकूण संख्या 54,33,506 पर्यंत पोहोचली. गेल्या 24 तासांत 52,898 रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने कोरोनामुक्त व्यक्तींची एकूण संख्या 49,27,480 इतकी झाली. चोवीस तासांत 679 जणांचा मृत्यू ओढवला असून, राज्यातील कोरोनामृत्यूंची संख्या 83,777 झाली आहे. राज्यात आता 4,19,727 रुग्ण उपचाराधीन आहेत.
मुंबईकरांना दिलासादायक बाब म्हणजे नवीन रुग्णसंख्या 1000 च्या आत आली आहे. गेल्या 24 तासांत 961 रुग्णांची भर पडल्याने मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 6,90,023 झाली आहे. शहरात आज 1874 रुग्ण कोरोनातून बरे झाले, तर 44 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. आता शहरात 31,790 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गोवा अपडेट्स:-
राज्यात संचारबंदी वाढवण्याचा निर्णय गोवा सरकार शनिवारपर्यंत घेईल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. आयुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे राज्याच्या परिस्थितीचे मूल्यमापन केल्यानंतर हा निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता, 9 मे ते 23 मे अशी 15 दिवसांची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. 1,358 नवीन रुग्णांची भर पडली असून 3,120 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गोव्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी होऊन 23,946 झाली आहे. गेल्या 24 तासांत 3,120 रुग्ण बरे झाले असून, कोरोनामुक्तीचा दर उच्च ठेवण्याचा शिरस्ता गोव्याने कायम राखला आहे. आता गोवा राज्याचा कोरोनामुक्तीचा दर 81.16 टक्के इतका आहे.
M.Chopade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1720066)
Visitor Counter : 247