संरक्षण मंत्रालय

भारतीय लष्कराच्या अभियंत्यांनी कोविड रुग्णांसाठी द्रवरूप ऑक्सिजनचे कमी दाबाच्या ऑक्सिजन गॅसमध्ये प्रभावीपणे रूपांतर करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधला

Posted On: 19 MAY 2021 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 मे 2021

कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान भारतात ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलिंडरच्या मागणीत लक्षणीय वाढ दिसून आली.  क्रायोजेनिक टाक्यांमध्ये द्रव स्वरूपात ऑक्सिजनची वाहतूक केली जात असल्यामुळे द्रवरूप ऑक्सिजनचे ऑक्सिजन वायूमध्ये वेगाने  रूपांतरण आणि रुग्णांच्या बेडवर उपलब्धता सुनिश्चित करणे हे कोविड रूग्णांचे व्यवस्थापन करणाऱ्या सर्व रुग्णालयांसमोर एक कठीण आव्हान होते.

मेजर जनरल संजय रिहानी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराच्या अभियंत्यांच्या चमूने  या आव्हानावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला. गॅस सिलिंडरच्या वापराशिवाय  ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी  एक विशेष कृतीदलाची स्थापना केली गेली

सात दिवसांत, सीएसआयआर आणि डीआरडीओशी थेट सल्लामसलत आणि भौतिक सहाय्य मिळवून  लष्कराच्या अभियंत्यांच्या चमूने  व्हेपोरायझर्स , पीआरव्ही आणि लिक्विड ऑक्सिजन सिलिंडरचा वापर करून एक संशोधन विकसित केले. कोविड बेडवर आवश्यक दाब आणि तापमानात ऑक्सिजन गॅसमध्ये द्रव ऑक्सिजनचे सतत रूपांतरण सुनिश्चित करण्यासाठी, या चमूने  कमी क्षमतेच्या (250 लिटर) सेल्फ प्रेशरिंग लिक्विड ऑक्सिजन सिलेंडरचा वापर केला आणि  विशिष्ट डिझाइनच्या  व्हेपोरायझरद्वारे  आणि थेट वापरण्यायोग्य.आउटलेट प्रेशर (4 बार) द्वारे  आवश्यक लीक प्रूफ पाइपलाइन आणि प्रेशर वाल्व्हसह आउटलेट प्रेशर (4 बार) द्वारे त्यावर प्रक्रिया केली

दिल्ली कॅन्टोन्मेंट  येथील बेस हॉस्पिटलमध्ये 40  बेडसाठी दोन ते तीन दिवस ऑक्सिजन गॅस पुरवू शकणाऱ्या दोन लिक्विड सिलिंडर्ससह एक प्रोटोटाइप कार्यान्वित केला आहे. या चमूने रुग्णालयांमध्ये  शिफ्टिंग आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी मोबाइल व्हर्जनची देखील चाचणी केली आहे. ही प्रणाली आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहे आणि वापरण्यास  सुरक्षित आहे,  कारण पाइपलाइन किंवा सिलिंडर्समध्ये उच्च गॅस प्रेशर कमी करते  आणि ती ऑपरेट करण्यासाठी कोणत्याही वीजपुरवठ्याची आवश्यकता नसते. ह्या प्रणालीच्या प्रतिकृती  तयार करणे सहज शक्य आहे.

हे नाविन्यपूर्ण संशोधन जटिल समस्यांवर  साधे आणि व्यवहार्य उपाय शोधण्यात  नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याच्या भारतीय लष्कराच्या वचनबद्धतेचे   आणखी एक उदाहरण आहे. कोविड 19 च्या विरोधातल्या  लढाईत भारतीय लष्कर कायम राष्ट्राबरोबर आहे.

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1720008) Visitor Counter : 187