पंतप्रधान कार्यालय

राज्य वर्धापन दिनानिमित्त सिक्कीमच्या जनतेला पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

Posted On: 16 MAY 2021 12:12PM by PIB Mumbai

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राज्य वर्धापनदिनानिमित्त सिक्कीमच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले: "राज्य वर्धापनदिनानिमित्त सिक्कीमच्या जनतेला शुभेच्छा. या राज्याला निसर्ग सौंदर्याचं वरदान लाभलं असून हे सहृदय लोकांचं निवासस्थान आहे. सेंद्रीय शेतीसारख्या क्षेत्रात सिक्कीमने आदर्श निर्माण केला आहे. राज्यातील जनतेच्या सातत्यपूर्ण विकास आणि निरामय आरोग्याकरता प्रार्थना करतो."

***

MC/VG/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1719057) Visitor Counter : 147