पंतप्रधान कार्यालय

हेमंत बिस्वा सर्मा यांनी आसामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले

प्रविष्टि तिथि: 10 MAY 2021 1:01PM by PIB Mumbai

हेमंत बिस्वा सर्मा आणि इतर मंत्र्यांनी आसाममध्ये शपथ ग्रहण केल्याबद्दल  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या सर्वांचे अभिनंदन केले आहे.

ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले, “आज शपथ घेतलेले हेमंत बिस्वा सर्मा आणि इतर मंत्र्यांचे मी अभिनंदन करतो. हे सर्वजण आसामच्या विकासाच्या प्रवासाला वेग देतील आणि तेथील जनतेच्या आकांक्षा पूर्ण करतील याबद्दल मला पूर्ण विश्वास वाटतो आहे.”

सर्वानंद सोनोवाल यांच्या योगदानाचे देखील पंतप्रधानांनी कौतुक केले. ट्वीटरवरील संदेशात पंतप्रधान म्हणाले, “गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात, माझे महत्त्वाचे सहकारी सर्वानंद सोनोवाल यांनी जनताभिमुख आणि विकासाभिमुख प्रशासनाची धुरा उत्तम रीतीने सांभाळली. आसाम राज्याची प्रगती साधण्यासाठी आणि राज्यात पक्ष बळकट करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान खूप मोठे आहे.”

 

*****

Jaydevi PS/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1717411) आगंतुक पटल : 310
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam