PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
09 MAY 2021 8:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 9 मे 2021


- Govt. of India has so far provided more than 17.56 crore vaccine doses to States/UTs Free ofCost
- Global Aid including 14 Oxygen Plants and more than 3 L Remdesivir Vials proactively cleared and rushed to States/UTs to combat COVID-19
- Nearly 4200 MT Oxygen delivered by Oxygen Expresses to Maharashtra, MP, Haryana, Rajasthan, Delhi, & UP
|
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona
PRESS INFORMATION BUREAU
MINISTRY OF INFORMATION AND BROADCASTING
GOVERNMENT OF INDIA


आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
लसीकरण, हा संपूर्ण देशभरातील कोविड नियंत्रण आणि व्यवस्थापनाच्या (चाचणी, संपर्कातील व्यक्तिंचा मागोवा, उपचार आणि कोविड अनुरुप वर्तणूक यांचा समावेश असलेल्या) पाच घटकांच्या रणनीतीचा अविभाज्य भाग आहे.
कोविड-19 लसीकरणाच्या उदारमतवादी आणि गतीशील अशा तिसऱ्या टप्प्यातील रणनीतीची अंमलबजावणी 1 मे 2021 पासून सुरू झाली आहे. नवीन पात्र लोकसंख्या गटांची नोंदणी 28 एप्रिलपासून सुरू झाली आहे. पात्र वयोगटातील लाभार्थी एकतर थेट कोविन पोर्टलवर (cowin.gov.in) किंवा आरोग्यसेतू अॅपद्वारे नोंदणी करू शकतात.
भारत सरकारने आतापर्यंत राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना विनामूल्य 17.56 कोटी लसींच्या मात्रा (17,56,20,810) प्रदान केल्या आहेत. यापैकी वाया गेलेल्या लसींसह एकूण 16,83,78,796 लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत (आज सकाळी 8 वाजेपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार)
72 लाखांहून अधिक कोव्हिड लसींच्या मात्रा (72,42,014) अद्यापही राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध आहेत. नकारात्मक शिल्लक दर्शविणाऱ्या राज्यांतील मात्रा सशस्त्र दलांने पुरविलेल्या लसीच्या मात्रांशी जुळत नसल्यामुळे पुरविल्या गेलेल्या लसींपेक्षा जास्त वापर (वाया गेलेल्या मात्रांसहित समाविष्ट) दर्शवित आहेत.
पुढील तीन दिवसांत राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना आणखी 46 लाखाहून अधिक (46,61,960) लसींच्या मात्रा प्राप्त होतील.
इतर अपडेटस्
- जागतिक महामारीच्या दुसऱ्या लाटेत कोविड-19 रुग्ण संख्येत झालेल्या अभूतपूर्व वाढीची आव्हाने आणि आवश्यकता पूर्ण करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी जागतिक समुदाय मदतीचा हात पुढे करत आहे. या गंभीर टप्प्यात केंद्र सरकार, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या प्रयत्नांना पूरक म्हणून या जागतिक मदतीचे प्रभावीपणे आणि तातडीने वाटप होईल, हे सुनिश्चित करत आहे. या अंतर्गत 6,608 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, 3,856 ऑक्सिजन सिलिंडर्स, 14 ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट्स, 4,330 व्हेंटिलेटर / बी आय पीएपी (Bi PAP)/ सी पीएपी (C PAP) आणि 3 लाखांपेक्षा जास्त रेमडेसिवीर कुप्या आतापर्यंत वितरीत करण्यात आल्या आहेत/पाठवल्या आहेत.
- भारतीय हवाई दलाचा पालम हवाई तळावर 27 एप्रिल 21 पासून कोविड हवाई मदत व्यवस्थापन कक्ष (सीएएसएमसी) कार्यरत आहे. परदेशातून येणाऱ्या सर्व मदत सामग्रीच्या वितरणासाठी प्रभावी समन्वयन करणे हे या कक्षाचे प्राथमिक कार्य आहे. हा कक्ष चोवीस तास कार्यरत असतो. संसाधनांसाठी समन्वय साधण्याच्या दृष्टीने मनुष्यबळ, विमानातून सामग्री उतरवून घेऊन जाणे आणि सामान तसेच सपाट पृष्ठभाग असलेली सामान वाहून नेणारी आणि औद्योगिक वाहने यांसारख्या गरजांची पूर्तता करण्यात येत आहे.
- ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशला आजपर्यंत जवळपास 4200 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा सर्व अडथळ्यांवर मात करून आणि नवीन उपाय शोधून भारतीय रेल्वे ‘लिक्विड मेडिकल ऑक्सिजन’ (एलएमओ) म्हणजेच द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू देशभरातील विविध राज्यात पोचवला आहे. आत्तापर्यंत, भारतीय रेल्वेने सुमारे 4200 मेट्रिक टन एलएमओ 268 अधिक टँकरद्वारे देशभरामध्ये वाहून नेवून वितरीत केला आहे.
- संरक्षण मंत्रालयाने लष्करी वैद्यकीय तुकडीतील (एएमसी) माजी अधिकारी /शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी सशस्त्र दल वैद्यकीय सेवा महासंचालकांना आदेश जारी केला आहे. 'टूर ऑफ ड्यूटी’ योजनेअंतर्गत, 2017 ते 2021 दरम्यान सेवानिवृत्त झालेले लष्करी वैद्यकीय तुकडीतील (एएमसी) 400 माजी अधिकारी/ एसएससी म्हणजेच शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमाल 11 महिन्यांच्या कालावधीच्या कंत्राटी तत्वावर भर्ती केली जाण्याची अपेक्षा आहे.
- कोविड-19 महामारी दरम्यान माजी आंतराष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षकांना वैद्यकीय, वित्तीय आणि नियोजनासाठी लागणारे इतर सहाय्य सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने एक विशेष मदत कक्ष तयार करण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटना, युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण एकत्र आले आहेत. वैद्यकीय सहाय्यता, ऑक्सिजन, रुग्णालयात दाखल करणे आणि अन्य मदतीसाठी, माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक आपल्या गरजा (https://www.research.net/r/SAI-IOA-Covid-19 ) या ऑनलाईन मंचाच्या माध्यमातून कळवू शकतात. हे पोर्टल पूर्वीपासूनच कार्यान्वित आहे. प्रत्येक राज्यातील अर्जदाराला मदत करण्यासाठी राष्ट्रीय समिती शिवाय भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे प्रतिनिधी,राज्य सरकारचे अधिकारी आणि क्रीडा प्राधीकरणाच्याअधिकाऱ्यांचा समावेश असलेले राज्यस्तरावरील कार्यदल स्थापन करण्यात आले आहे.
- केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा विभाग, इरेडा आणि एनएचपीसी म्हणजे राष्ट्रीय जलविद्युत उर्जा महामंडळ यांनी इरेडाच्या दिल्ली विभागीय कार्यालयात या मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या 18 ते 44 वयोगटातील कार्यरत केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रमाअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 7 आणि 8 मे रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम पूर्ण केली.अक्षय उर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री आर के सिंग यांच्या निर्देशानुसार ही मोहीम हाती घेण्यात आली.
- र्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाने काल 25 राज्यांतील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना 8923.8 कोटी रुपयांचा निधी वितरीत केला. हा निधी गाव, तालुका आणि जिल्हा या पंचायत राज्यांच्या तिन्ही स्तरांसाठी वितरीत करण्यात आला आहे. शनिवारी वितरीत करण्यात आलेला निधी 2021-22 या आर्थिक वर्षासाठीच्या अनुदानाचा (अनटाईड ग्रँटस) पहिला हप्ता आहे. याचा विनियोग या सर्व स्थानिक संस्था, इतर उपाययोजनांसह कोविड-19 महामारीचा मुकाबला करण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी करू शकतील. या तीन स्तरीय स्थानिक संस्थांना यामुळे महामारीचा मुकाबला करण्याच्या संसाधनांचा यथायोग्य वापर करण्यासाठी हा निधी सहाय्यक होईल.
-
IMPORTANT TWEETS
#IndiaFightsCorona:
Taking forward our Comprehensive Strategic Partnership. Consignment of 3 O2 generators & 1,000 ventilators arrives from UK. Each generator has capacity to produce 500 litres of O2/min, enough to treat 50 people at a time.#Unite2FightCorona#StayHomeStaySafe pic.twitter.com/Z8q66n8E0C
— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) May 9, 2021
दावा: एक मैसेज में दावा किया जा रहा है कि लंबे समय तक मास्क के उपयोग से शरीर में कार्बन डाइऑक्साइड की अधिकता और ऑक्सीजन की कमी हो जाती है।#PIBFactCheck: यह दावा #फ़र्ज़ी है। #कोरोनावायरस के संक्रमण से बचाव के लिए सही तरीके से मास्क जरूर लगाएं। pic.twitter.com/ziSDpPOnhL
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 8, 2021
FACTCHECK


***
M.Chopade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1717306)
Visitor Counter : 288