ऊर्जा मंत्रालय

इरेडा (IREDA) आणि आणि एनएचपीसी यांनी 300 कर्मचाऱ्यांचे केले लसीकरण

Posted On: 09 MAY 2021 5:09PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001N0V0.jpghttps://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002C3JA.jpg

केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा विभाग, इरेडा आणि एनएचपीसी म्हणजे राष्ट्रीय जलविद्युत उर्जा महामंडळ यांनी इरेडाच्या दिल्ली विभागीय कार्यालयात या मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या 18 ते 44 वयोगटातील कार्यरत केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रमाअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 7 आणि 8 मे रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम पूर्ण केली.

अक्षय उर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच  कौशल्य विकास आणि  उद्योजकता राज्यमंत्री आर के सिंग यांच्या निर्देशानुसार ही मोहीम हाती घेण्यात आली.

कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान अधिकाधिक कर्मचाऱ्यांचे लसीकरण व्हावे या उद्देशाने ही लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली असून, या मोहिमेत आयआरईडीए, एनएचपीसी, ऊर्जा मंत्रालय, एमएचए, पीएफसी, आरईसी, बीएचईएल, बीबीएमबी, एमएमटीसी, नीपको, पीटीसी, एनएसपीसीएल आणि सीईए यामधील एकूण 317 पात्र कर्मचाऱ्यांना यावेळी लसीची पहिली मात्रा देण्यात आली. लसीकरण मोहिमेच्यावेळी सर्व कोविड सुरक्षितता मार्गदर्शक तत्वांचे पालन  करण्यात आले.

"एक आरोग्यपूर्ण कार्यबल सक्षम करण्यासाठी संरक्षण आणि आत्मविश्वास सुनिश्चित करण्याचा हा प्रयत्न आहे. यामुळे सामान्य जीवन सुरक्षितपणे जगण्यास मदत होईल जेणेकरुन वेगवान आर्थिक पुनर्प्राप्ती होईल, असे सांगत यावेळी इरेडाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार दास यांनी या मोहिमेचे महत्व अधोरेखित केले आणि एनएचपीसी तसेच अपोलो रुग्णालयाचे सहकार्य आणि योगदान दिल्याबद्दल  त्यांचे आभार मानले.

***

S.Thakur/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1717249) Visitor Counter : 271