संरक्षण मंत्रालय

माजी एएमसी/एसएससी अधिकाऱ्यांच्या भर्तीसाठी एएफएमएसच्या महासंचालकांना मिळाली मंजुरी

Posted On: 09 MAY 2021 3:48AM by PIB Mumbai

 

संरक्षण मंत्रालयानाने लष्करी वैद्यकीय तुकडीतील (एएमसी) माजी अधिकारी /शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी सशस्त्र दल वैद्यकीय सेवा महासंचालकांना आदेश जारी केला आहे. 'टूर ऑफ ड्यूटीयोजनेअंतर्गत, 2017 ते 2021 दरम्यान सेवानिवृत्त झालेले लष्करी वैद्यकीय तुकडीतील (एएमसी) 400 माजी अधिकारी/ एसएससी म्हणजेच शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमाल 11 महिन्यांच्या कालावधीच्या कंत्राटी तत्वावर भर्ती केली जाण्याची अपेक्षा आहे.

08 मे 2021 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, सेवानिवृत्तीच्यावेळी असलेल्या वेतनातून मूळ निवृत्तीवेतनात वजावट करून एक निश्चित मासिक एकरकमी रक्कम प्रदान केली जाईल, त्यासोबतच आवश्यक तज्ज्ञ वेतन देण्यात येईल.  कराराच्या मुदतीत या रकमेत कोणताही बदल होणार नाही, आणि कोणतेही अन्य भत्ते दिले जाणार नाहीत. भर्ती करण्यात येणारे  वैद्यकीय अधिकारी नागरी मानकांनुसार तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.

हे लक्षात घ्यायला हवे की, सध्याच्या कोविड -19 परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरी प्रशासनाला सहाय्य करण्याच्या दृष्टीने अतिरिक्त मनुष्यबळाची जमवाजमव करण्यासाठी  संरक्षण मंत्रालयाने अनेक पावले उचलली आहेत.  एएफएमएसने यापूर्वीच विविध रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ, विशेषज्ञ आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांसह अतिरिक्त डॉक्टर तैनात केले आहेत तर एएफएमएसच्या शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या डॉक्टरांच्या सेवेला दिनांक 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, यामुळे डॉक्टरांची संख्या 238 ने वाढली आहे. आरोग्य व्यावसायिकांचे कार्यबल अधिक मजबूत करण्यासाठी एएफएमएसमधून अलीकडेच  सेवानिवृत्त झालेल्या डॉक्टरांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त, देशातील सर्व नागरिकांना ई-संजीवनी ओपीडीवर विनामूल्य ऑनलाईन सल्ला देण्यासाठी  संरक्षण क्षेत्रातील माजी डॉक्टरांना घेतले आहे. या सेवेचा लाभ  https://esanjeevaniopd.in/  या संकेतस्थळावरून घेता येईल.  निवृत्त  सैनिक आणि त्यांच्यावरील अवलंबितांची देखभाल करण्यासाठी अंशदायी आरोग्य योजना (ईसीएचएस) अंतर्गत जास्त भार असलेल्या 51  सर्वरोग चिकित्सालयांमध्ये अतिरिक्त कर्मचाऱ्यांना कंत्राटी तत्वावर तीन महिन्यांसाठी रात्रपाळीसाठी कामावर ठेवण्यात आले आहे.

***

S.Thakur/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1717240) Visitor Counter : 274