युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

कोविड-19 महामारीच्या काळात माजी आंतराष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षकांना सहाय्य करण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटना, युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधीकरण आले एकत्र

Posted On: 09 MAY 2021 4:15PM by PIB Mumbai

 

कोविड-19 महामारी दरम्यान माजी आंतराष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षकांना वैद्यकीय, वित्तीय आणि नियोजनासाठी लागणारे इतर सहाय्य सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने एक विशेष मदत कक्ष तयार करण्यासाठी  भारतीय ऑलिम्पिक संघटना, युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण एकत्र आले आहेत.

वैद्यकीय सहाय्यता, ऑक्सिजन, रुग्णालयात दाखल करणे आणि अन्य मदतीसाठी, माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक आपल्या गरजा  (https://www.research.net/r/SAI-IOA-Covid-19 ) या ऑनलाईन मंचाच्या माध्यमातून कळवू शकतात. हे पोर्टल पूर्वीपासूनच कार्यान्वित आहे. प्रत्येक राज्यातील अर्जदाराला मदत करण्यासाठी राष्ट्रीय समिती शिवाय भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे प्रतिनिधी,राज्य सरकारचे अधिकारी आणि क्रीडा प्राधीकरणाच्याअधिकाऱ्यांचा समावेश असलेले राज्यस्तरावरील  कार्यदल स्थापन करण्यात आले आहे.

या उपक्रमाबद्दल बोलताना केंद्रीय युवा व्यवहार आणि  क्रीडा मंत्री किरेन रिजिजू म्हणाले,'' ज्यांनी आयुष्यभर भारताच्या  क्रीडा क्षेत्रात आपले योगदान दिले आहे आणि देशाचे नाव  उज्वल केले आहे त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. हा कठीण काळ आहे आणि आम्हाला सुनिश्चित करायचे आहे की, आमचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षकांना कोविड-19 महामारीविरोधात लढा देण्यासाठी एक संपूर्ण मदत यंत्रणा कार्यरत आहे. सरकार आणि भारतीय ऑलिम्पिक संघटना यांच्या या संयुक्त उपक्रमामुळे मी आनंदी आहे. मला विश्वास आहे की आम्ही गरजूंना नक्की मदत करू''.

राज्य सरकारांसोबतच्या भागीदारीतून वैद्यकीय आणि तार्किक सहाय्यता प्रदान करण्यासह, खेळाडूंसाठीच्या पंडित दीनदयाल उपाध्याय राष्ट्रीय कल्याण निधीतून (PDUNWFS) निधीही दिला जाईल. या अंतर्गत गंभीर स्थितीत असलेल्या खेळाडूंना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जाईल.

****

S.Thakur/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1717243) Visitor Counter : 280