आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड व्यवस्थापनासाठी भारत सरकार कडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील वैद्यकीय सेवा संस्थांना जागतिक मदतीचे प्रभावीपणे आणि त्वरित वितरण


आत्तापर्यंत 6608 ऑक्सिजन काँसंट्रेटर्स; 3856 ऑक्सिजन सिलिंडर; 14 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प; 4330 व्हेंटिलेटर / Bi PAP, सुमारे 3 एल रेमडेसिव्हिर वायल्स वितरित / पाठवल्या

Posted On: 08 MAY 2021 5:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 मे 2021

 

भारताबद्दल एकता व सद्भावना दर्शविणाऱ्या जागतिक समुदायाने कोविड 19 विरूद्धच्या सामूहिक लढाईत भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. भारत सरकारने प्रभावी वाटपासाठी व भारताला प्राप्त होणाऱ्या पुरवठ्याचे त्वरित वितरण करण्यासाठी एक सुव्यवस्थित व पद्धतशीर यंत्रणा तयार केली आहे. हे अत्यधिक विशिष्ट वैद्यकीय सेवा संस्था आणि प्राप्तकर्ती राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या वैद्यकीय पायाभूत सुविधांना पूरक बनविण्यात मदत करेल आणि रुग्णालयात दाखल केलेल्या कोविड 19 रूग्णांच्या प्रभावी नैदानिक व्यवस्थापनासाठी त्यांची क्लिनिकल व्यवस्थापन क्षमता बळकट करेल.

भारत सरकार 27 एप्रिल 2021 पासून विविध देशांकडून / संस्थांकडून आंतरराष्ट्रीय देणगी आणि कोविड -19 प्रतिबंधक वैद्यकीय पुरवठा आणि उपकरणे घेत आहे.

एकूण 6608 ऑक्सिजन काँसंट्रेटर्स; 3856 ऑक्सिजन सिलिंडर; 14 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प; 4330 व्हेंटिलेटर / Bi PAP, सुमारे 3 एल रेमडेसिव्हिर वायल्स 27 एप्रिल 2021 ते 07 मे 2021 या कालावधीत वितरीत / पाठविल्या गेल्या आहेत.

अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारी मंच (यूएसआयएसपीएफ), स्वित्झर्लंड, पोलंड, नेदरलँड आणि इस्त्राईल कडून 7 मे 2021 रोजी प्राप्त झालेल्या मोठ्या वस्तूंमध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत:

  • ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स (2060),
  • रेमडेसिव्हिर (30,000),
  • व्हेंटिलेटर (467),
  • ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प  (03)

प्रभावी त्वरित वाटप आणि प्राप्तकर्ते राज्य / केंद्रशासित प्रदेश आणि संस्था यांना सुसूत्र वितरण ही एक निरंतर प्रक्रिया असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयामार्फत नियमितपणे या सर्वांचे परीक्षण केले जात आहे.

फोटो 1: अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारी मंचाकडून (यूएसआयएसपीएफ) मिळालेले 100 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आज दिल्लीहून आसामला रवाना झाले.

फोटो 2. 420.0 लिटरचा राखीव ऑक्सिजन टँक असलेली आणि  एक जर्मन मोबाइल ऑक्सिजन उत्पादन आणि भरण्याची प्रणाली, वैद्यकीय वापरासाठी 93% ऑक्सिजन असलेली 360.0 लिटरची जर्मन ऑक्सिजन निर्मिती प्रणाली आज पहाटे डीआरडीओमध्ये त्यांच्या आरोग्य सुविधेसाठी पोचविण्यात आली.

फोटो  3. नेदरलँडमधून मिळालेले 112  व्हेंटिलेटर आज दिल्ली ते तेलंगणा मार्गावर आहेत.

अनुदान, मदत आणि देणग्या म्हणून परदेशी कोविड मदत सामग्रीच्या वाटपात समन्वय साधण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयात एक समर्पित समन्वय कक्ष तयार केला गेला आहे. 26 एप्रिल 2021 पासून हा कक्ष कार्यरत आहे. आरोग्य मंत्रालयाकडून 2 मे, 2021 पासून एक मानक प्रणाली तयार केली गेली आहे.

 

* * *

S.Tupe/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1717036) Visitor Counter : 182