संरक्षण मंत्रालय
आपत्कालीन वापरासाठी डीआरडीओने विकसित केलेल्या कोविड-प्रतिबंधक औषधाला डीसीजीआयची मंजुरी
Posted On:
08 MAY 2021 4:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 मे 2021
हैदराबादच्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज (डीआरएल) च्या सहयोगातून संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस (आयएनएमएएस) या प्रयोगशाळेने कोविड -19 विरोधात उपचारात्मक अनुप्रयोग करण्यासाठी 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी) हे औषध विकसित केले आहे. क्लिनिकल चाचणी परिणामांनी असे दर्शविले आहे की हे रेणू, रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना जलद बरे होण्यास मदत करतात आणि ऑक्सिजन वरील अवलंबित्व कमी करतात. 2-डीजीने उपचार केलेल्या मोठ्या प्रमाणावरील रुग्णांची आरटी-पीसीआर निगेटिव्ह दिसून आली. कोविड -19 ग्रस्त लोकांना या औषधाचा प्रचंड फायदा होईल.
महामारीविरोधात सज्जतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत डीआरडीओने 2-डीजी-कोविड-विरोधी उपचारात्मक अनुप्रयोग विकसित करण्याचा पुढाकार घेतला.
विविध मानकांच्या धर्तीवर कार्यक्षमतेचा कल बघता प्रमाणित औषधांच्या तुलनेत 2-डीजीने लक्षणे असलेले रुग्ण जलद बरे झाले.
यशस्वी निकालांच्या आधारे डीसीजीआयने नोव्हेंबर 2020 मध्ये तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांना परवानगी दिली. डिसेंबर 2020 ते मार्च 2021 दरम्यान दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू मधील 27 कोविड रुग्णालयात 220 रुग्णांवर III ऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी घेण्यात आली. तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीचा सविस्तर डेटा डीसीजीआयकडे सादर करण्यात आला. 2-डीजी आर्ममध्ये, रुग्णांचे प्रमाण जास्त प्रमाणात लक्षणानुसार सुधारले गेले आणि एसओसीच्या तुलनेत तिसऱ्या दिवसापर्यंत पूरक ऑक्सिजनवरील अवलंबित्व (42% च्या तुलनेत 31%) कमी झाले जे ऑक्सिजन थेरपी / अवलंबित्व यापासून लवकर सुटका दर्शवते.
65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या रुग्णांमध्ये असाच कल दिसून आला. 01 मे 2021 रोजी डीसीजीआयने कोविड -19 च्या मध्यम ते गंभीर रूग्णांना या औषध उपचारासाठी थेरपी म्हणून आपत्कालीन वापरास परवानगी दिली.
औषध पावडर स्वरूपात पाउच मध्ये येते, जे पाण्यात विरघळवून पिता येते. हे विषाणू, संक्रमित पेशींमध्ये जमा होऊन व्हायरल संश्लेषण आणि उर्जा उत्पादन थांबवून विषाणू वाढीस प्रतिबंधित करते. विषाणूंनी संक्रमित पेशींमध्ये त्याचे निवडक संग्रह हे औषध उत्कृष्ट बनवते.
सध्या सुरू असलेल्या दुसर्या कोविड -19 लाटेमधे, मोठ्या संख्येने रूग्णांना तीव्र ऑक्सिजन अवलंबित्व लागत आहे आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे. संक्रमित पेशींमध्ये औषधाचा वापर होण्याच्या यंत्रणेमुळे हे औषध मौल्यवान जीव वाचवू शकेल अशी अपेक्षा आहे. यामुळे कोविड -19 च्या रुग्णांचा रुग्णालयीन कालावधीही कमी होतो.
* * *
S.Tupe/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1717023)
Visitor Counter : 550