पंतप्रधान कार्यालय

भारत- ब्रिटन दरम्यान 4 मे 2021ला होणार आभासी शिखर परिषद

Posted On: 02 MAY 2021 11:00PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 मे 2021 ला ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासमवेत आभासी माध्यमातून शिखर परिषद घेणार आहेत.

भारत आणि ब्रिटन 2004 पासून धोरणात्मक भागीदार आहेत. उभय देशादरम्यान विविध क्षेत्रात नियमित उच्च स्तरीय आदान-प्रदान आणि सहकार्य वाढते राहिले आहे. आपले बहुआयामी धोरणात्मक संबंध अधिक वृद्धींगत करण्यासाठी आणि  परस्पर हिताच्या  प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर सहकार्य वाढवण्यासाठी ही  महत्वपूर्ण संधी आहे. कोविड-19 संदर्भातले सहकार्य आणि या महामारीशी लढा देण्यासाठी  जागतिक प्रयत्न या बाबतही या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल.

या परिषदे दरम्यान विस्तृत पथदर्शी आराखडा 2030  जारी करण्यात येईल. येत्या दहा वर्षात,  दोन्ही देशांतल्या जनतेमधले संबंध, व्यापार आणि समृद्धी,संरक्षण, हवामान विषयक कृती आणि आरोग्यसेवा या पाच मुख्य क्षेत्रात भारत- ब्रिटन यांच्यातले सहकार्य अधिक व्यापक आणि घनिष्ठ करण्यासाठी हा आराखडा मार्गदर्शक ठरणार आहे.

***


JPS/NC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1715624) Visitor Counter : 144