रेल्वे मंत्रालय

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात वापरण्यासाठी रेल्वेने आणले अतिरिक्त कोविड केअर कोच


तातडीची गरज भागविण्यासाठी अलगीकरण (आयसोलेशन) कोच नंदूरबार येथून पालघरला हलविले

Posted On: 02 MAY 2021 4:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 मे 2021


कोविड विरूद्धच्या एकत्रित लढ्यात देशाच्या क्षमता बळकट करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने आपल्या बहुउद्देशीय पुढाकारांमधे सुमारे 64000 खाटा असलेले जवळजवळ 4000 अलगीकरण कोच तैनात केले आहेत.

राज्यांसमवेत एकत्रितपणे काम करण्यासाठी आणि जलदरित्या पोहोचता यावे यासाठी रेल्वेने परिमंडळ व विभागांना एकत्रित कार्यासाठी विकेंद्रीकरण कृती योजना तयार केली आहे. हे अलगीकरण कोच सहजपणे हलविले जाऊ शकतात आणि भारतीय रेल्वे जाळ्याच्या मागणीच्या ठिकाणी तैनात केले जाऊ शकतात.

कोविड विषयक काळजी घेण्यासाठी राज्यांच्या मागणीनुसार सध्या जवळजवळ 3400 खाटांच्या क्षमतेसह 213 कोच विविध राज्यांकडे सोपविण्यात आले आहेत. अलगीकरण कोचचा उपयोग सध्या दिल्ली, महाराष्ट्र (अजनी आयसीडी, नंदूरबार), मध्य प्रदेश (इंदूर जवळ तिहाई) येथे केला जातो. नुकतीच नागालँडच्या राज्य सरकारकडून अलगीकरण कोचची मागणी आली आहे.

जिल्हाधीकाऱ्यांच्या मागणीनुसार अलगीकरण कोच नंदूरबार येथून पालघर येथे हलविण्यात येत आहेत.

राज्यातील नंदूरबारमध्ये गेल्या काही दिवसांत अलगीकरण कोचमध्ये 6 नवीन रुग्ण दाखल झाले होते, तर तीन रुग्णांना अलगीकरण कालावधीनंतर सोडण्यात आले. या सुविधेत 35 कोविड रूग्ण सध्या अलगीकरणात आहेत. राज्य आरोग्य प्राधिकरणाद्वारे आतापर्यंत 95 रुग्णांना दाखल केल्याची नोंद करण्यात आली तर त्यातील 60 जणांना सोडण्यात आले.  343 खाटा अजूनही उपलब्ध आहेत. रेल्वेने अजनी इनलँड कंटेनर डेपो येथे 11 कोविड केअर कोच ( वैद्यकीय कर्मचारी आणि पुरवठा करणार्‍या एका कोचसह) नागपूर महानगरपालिकेच्या स्वाधीन केले आहेत.

 

* * *

S.Thakur/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1715510) Visitor Counter : 186