संरक्षण मंत्रालय

अहमदाबाद येथील पंतप्रधान कोविड केअर रुग्णालयासाठी नौदलाच्या पश्चिम कमांडकडून नौदल वैद्यकीय पथकाची नियुक्ती

Posted On: 30 APR 2021 10:34AM by PIB Mumbai

संपूर्ण देशभरात सध्या सुरु असलेल्या कोविड संकटाचा सामना करण्यासाठी सशस्त्र दले देशातील विविध    नागरी प्रशासनाला मदत करत आहेत . याचाच एक भाग म्हणून 29 एप्रिल 2021 रोजी नौदलाच्या पश्चिम कमांडकडून 57 सदस्यीय  वैद्यकीय पथक अहमदाबाद येथील पंतप्रधान कोविड केअर रुग्णालयात पाठवण्यात आले  आहे. या पथकामध्ये चार डॉक्टर, सात परिचारिका, 2  पॅरामेडिक्स आणि 20 सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश आहे. सुरुवातीला दोन महिन्यांसाठी या पथकाची नियुक्ती करण्यात आली असून, आवश्यकता भासल्यास हा कालावधी वाढविला जाईल.

 

***

Jaydevi PS/SM/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1714981) Visitor Counter : 180