नौवहन मंत्रालय

केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी प्रमुख बंदरांच्या रुग्णालयांचा कोविड सेवा व्यवस्थापनासंदर्भातील तयारीचा घेतला आढवा


बंदर रुग्णालयांमध्ये 422 विलगीकरण खाटा तर 305 प्राणवायू सहाय्यक खाटा

Posted On: 29 APR 2021 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 एप्रिल 2021

 

कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली बंदर रुग्णालयांच्या तयारीचा आढवा घेणारी बैठक पार पडली. सर्व बंदर रुग्णालयांच्या प्रमुखांनी आपल्या रुग्णालयाची कोविड-सेवा व्यवस्थापनाच्या दृष्टीने असलेली तयारी सादर केली.

सध्या देशभरात 12 बंदरावरील 9 रुग्णालये कोविड-19 सुविधेसाठी समर्पित करण्यात आली आहेत. विशाखापट्टण पोर्ट ट्रस्ट, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मार्मागोवा पोर्ट ट्रस्ट, चेन्नई पोर्ट ट्रस्ट, जवाहरलाल नेहरू पोर्ट न्यास, दीनदयाळ बंदर ट्रस्ट (आधीचे कांडला बंदर ट्रस्ट) याठिकाणी 422 विलगीकरण खाटा, 305 प्राणवायू सहाय्यक खाटा, 28 अतिदक्षता सुविधा खाटा आणि जीवरक्षक प्रणालीमुळे कोविड रुग्णांना सुविधा उपलब्ध होत आहेत.

येत्या काही दिवसांमध्ये सर्व बंदर प्रमुखांनी जलदगतीने त्यांच्या अख्यत्यारीतील रुग्णालयांच्या क्षमता वाढवाव्यात व CSR निधीचा वापर करत सुविधांमध्ये वाढ करावी असे निर्देश मंत्रीमहोदयांनी दिले. सर्व बंदरांवर प्राणवायू संबधित वाहतूकीकडे जातीने लक्ष देत ती वाहतूक जलद करावी अश्या सूचनाही मंत्र्यांनी दिल्या.

भारतामध्ये अभूतपूर्व परिस्थिती उद्भवली आहे. आपण आपल्या रुग्णालयांच्या क्षमतेत वृद्धी करून केव्हाही परिस्थितीला सामोर जाण्यासाठी सदैव तयार राहणे आवश्यक आहे. सर्व मुख्य बंदरांच्या साथीने सातत्यपूर्ण व एकत्रित प्रयत्नांनी आपण महामारीवर मात करू असा विश्वास मांडवीय यांनी व्यक्त केला.

 

* * *

S.Tupe/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1714895) Visitor Counter : 247