पंतप्रधान कार्यालय
कोविड व्यवस्थापनासाठी सैन्याची सज्जता आणि उपक्रमांचा पंतप्रधानांनी घेतला आढावा
Posted On:
29 APR 2021 1:24PM by PIB Mumbai
लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
कोविड व्यवस्थापनात मदत करण्यासाठी लष्कर राबवित असलेल्या विविध उपक्रमांवर यावेळी त्यांनी चर्चा केली.
लष्कराचे वैद्यकीय कर्मचारी विविध राज्य सरकारांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आल्याची माहिती जनरल एम एम नरवणे यांनी पंतप्रधानांना दिली. लष्कर देशाच्या विविध भागात तात्पुरती रुग्णालये सुरू करीत असल्याची माहितीही त्यांनी पंतप्रधानांना दिली.
जिथे शक्य आहे तिथे लष्कराची रुग्णालये सामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आल्याची माहिती जनरल एम एम नरवणे यांनी पंतप्रधानांना दिली. नागरिक उपचारासाठी त्याच्या नजीकच्या लष्करी रुग्णालयात जाऊ शकतात असेही त्यांनी नमूद केले.
आयात केलेले ऑक्सिजन टँकर आणि वाहनांचे व्यवस्थापन करण्यासाठी जिथे विशेष कौशल्ये आवश्यक आहेत तिथे लष्कर मनुष्यबळ उपलब्ध करून देत आहे अशी माहिती जनरल एम एम नरवणे यांनी पंतप्रधानांना दिली.
***
Jaydevi PS/SM/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1714818)
Visitor Counter : 325
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam