भारतीय स्पर्धा आयोग

टाटा डिजिटल लिमिटेड द्वारा सुपर मार्केट ग्रोसरी सप्लाय प्रायव्हेट लिमिटेड (एसजीएस) च्या एकूण भागभांडवलाच्या 64.3% पर्यंत अधिग्रहण आणि इनोव्हेटिव्ह रिटेल कॉन्सेप्ट्स प्रायव्हेट लिमिटेडवरील एसजीच्या संपूर्ण नियंत्रणाला सीसीआयची मंजूरी

Posted On: 29 APR 2021 10:35AM by PIB Mumbai

 

भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) टाटा डिजिटल लिमिटेडद्वारे सुपर मार्केट ग्रोसरी सप्लाय प्रायव्हेट लिमिटेड (एसजीएस) च्या एकूण भागभांडवलाच्या 64.3% पर्यंत अधिग्रहण आणि इनोव्हेटिव्ह रिटेल कॉन्सेप्ट्स प्रायव्हेट लिमिटेडवरील एसजीएसच्या संपूर्ण नियंत्रणाला मान्यता दिली आहे.


प्रस्तावित एकत्रीकरणात टाटा डिजिटल लिमिटेड (टीडीएल) द्वारे एक किंवा अनेक श्रुंखलांमध्ये प्राथमिक किंवा दुय्यम अधिग्रहणाच्या एकत्रीकरणाद्वारे एसजीएसच्या एकूण भाग भांडवलाच्या 64.3% पर्यंतच्या अधिग्रहणाचा समावेश आहे (व्यवहार 1).  त्यानंतर वेगळ्या व्यवहाराद्वारे एसजीएस इनोव्हेटिव्ह रिटेल कॉन्सेप्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (आयआरसी) वर संपूर्ण नियंत्रण मिळवू शकेल (व्यवहार 2) असे नमूद करण्यात आले आहे. व्यवहार 1 आणि व्यवहार 2 एकत्रितपणे प्रस्तावित एकत्रिकरण (संयोजन) म्हणून संबोधले जातील. प्रस्तावित एकत्रीकरणामुळे टीडीएलद्वारे बहुतांश भागभांडवलाचे अधिग्रहण आणि एसजीएसचे संपूर्ण नियंत्रण प्राप्त होईल.

टीडीएल ही टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड (टाटा सन्स) ची संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे. सध्या टीडीएल आयडेंटिटी अँड एक्सेस मॅनेजमेंट, लॉयल्टी प्रोग्राम, ऑफर्स आणि पेमेंट्सशी संबंधित तंत्रज्ञान सेवा पुरवत आहे. टाटा सन्स समूह, त्यांच्या समूह घटकांद्वारे, पुढील व्यवसाय करत आहे:  (अ) व्यवसाय ते व्यवसाय (बी 2 बी) अन्न व किराणा, घरगुती उत्पादने आणि वैयक्तिक व सौंदर्य उत्पादने (संबंधित उत्पादने) यांची भारतात विक्री; (ब) व्यवसाय ते ग्राहक (बी 2 सी) भारतात संबंधित उत्पादनांची विक्री; आणि (क) भारतात विशिष्ट पॅकेज्ड खाद्य व किराणा उत्पादनांचे उत्पादन व विक्री.

एसजीएस भारतीय कायद्यांतर्गत समाविष्ट असून business.bigbasket.com मार्फत भारतात संबंधित उत्पादनांची ऑनलाईन बी 2 बी विक्री करते.

आयआरसी भारतीय कायद्यांतर्गत समाविष्ट असून भारतात संबंधित उत्पादनांची ऑनलाईन बी 2 सी विक्री करते  आणि www.bigbasket.com हे संकेतस्थळ वेबसाइट आणि संबंधित मोबाइल ऍप्लिकेशन चालवते.

सीसीआयचा सविस्तर आदेश लवकरच प्रसिद्ध होईल

***

ST/SM/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1714802) Visitor Counter : 284