PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 28 APR 2021 7:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, मुंबई 28 एप्रिल 2021

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

भारतात देण्यात येणाऱ्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांनी आज 14.78 कोटीचा टप्पा ओलांडला.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार भारतात 21,18,435 सत्राद्वारे लसीच्या 14,78,27,367 मात्रा देण्यात आल्या.

यामध्ये 93,47,775 आरोग्य कर्मचारी (पहिली मात्रा), 61,06,237 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा), 1,22,21,975 फ्रंट लाईन कर्मचारी ( पहिली मात्रा ), 65,26,378 फ्रंट लाईन कर्मचारी(दुसरी मात्रा ), 60 वर्षावरील 5,10,85,677 लाभार्थी ( पहिली मात्रा ), 93,37,292 (दुसरी मात्रा ),45 ते 60 वयोगटातल्या 5,02,74,581 (पहिली मात्रा), आणि 29,27,452 लाभार्थी (दुसरी मात्रा ) यांचा समावेश आहे.

देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 67.26% मात्रा दहा राज्यात देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात 25 लाखापेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या.

लसीकरण अभियानाच्या 102 व्या दिवशी (27 एप्रिल 2021) ला 25,56,182 लसीकरण मात्रा देण्यात आल्या. यामध्ये 22,989 सत्रात 15,69,000 लाभार्थींना पहिली मात्रा आणि 9,87,182 लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.

भारतात एकूण 1,48,17,371 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 82.33%.आहे.

गेल्या 24 तासात 2,61,162 रुग्ण कोरोनातून बरे झाले.

यापैकी 79.01% व्यक्ती दहा राज्यातल्या आहेत.

गेल्या 24 तासात 3,60,960 नव्या रुग्णांची नोंद झाली.

नव्या रुग्णांपैकी 73.59% रुग्ण, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान या दहा राज्यांमध्ये आहेत.

महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 66,358 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.त्यानंतर उत्तर प्रदेश 32,921 आणि केरळमध्ये 32,819 नव्या रुग्णांची नोंद झाली.

भारतात आज उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या 29,78,709 आहे. ही देशातल्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 16.55% आहे.

देशातल्या एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी 71.91% रुग्ण नऊ राज्यांमध्ये आहेत.

राष्ट्रीय मृत्यू दरात घट होत असून हा दर सध्या 1.12% आहे.

गेल्या 24 तासात 3,293 रुग्णांचा मृत्यू झाला

यापैकी 78.53% मृत्यू दहा राज्यात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 895 जणांचा मृत्यू झाला, दिल्लीमध्ये 381 जणांचा मृत्यू झाला.

 

  इतर अपडेट्स :

महाराष्ट्र अपडेट्स

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने आज 18 ते 44 या वयोगटातील सर्व पात्र व्यक्तींना मोफत लस देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सरकारला 6,500 कोटी रुपये खर्च येणार असून 5.71 कोटी लोकांना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारने लसीकरण मोहीम व्यापक करत एक मे पासून 18 ते 44 वयोगटातील सर्वांना लस देण्याचे धोरण जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रात सध्या 13,000 केंद्रे आहेत, ज्यांच्या माध्यमातून 57.1 दशलक्ष लाभार्थ्यांचे लसीकरण येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

महाराष्ट्रात काल 895 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला, ही आजवरची कोविड मृत्यूंची सर्वाधिक संख्या होती. राज्यात काल 2.88 लाख इतक्या विक्रमी कोविड चाचण्या झाल्या आणि 66,358 नव्या कोविड रुग्णांचे निदान झाले

***

 

MC/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1714702) Visitor Counter : 185