पंतप्रधान कार्यालय
सहज वाहून नेण्याजोग्या 1 लाख ऑक्सिजन उपकरणांची पीएम केअर्स फंडातून खरेदी करण्यात येणार
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित आणखी 500 पीएसए ऑक्सिजन सयंत्राना पीएम केअर्स फंडाअंतर्गत मंजुरी
ऑक्सिजन उपकरणे आणि पीएसए सयंत्रामुळे मागणीच्या क्लस्टरजवळ ऑक्सिजन पुरवठ्यात होणार मोठी वाढ
Posted On:
28 APR 2021 5:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 एप्रिल 2021
सहज वाहून नेण्याजोग्या 1 लाख ऑक्सिजन उपकरणांची पीएम केअर्स फंडातून खरेदी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च स्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोविड व्यवस्थापनासाठी द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा सुधारण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. ऑक्सिजन पुरवणारी ही उपकरणे लवकरात लवकर खरेदी करून ज्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णाची संख्या मोठी आहे अशा राज्यांना पुरवण्याच्या सूचना पंतप्रधानांनी केल्या.
पीएम केअर्स फंडा अंतर्गत याआधी मंजूर करण्यात आलेल्या 713 पीएसए सयंत्राशिवाय 500 नव्या प्रेशर स्विंग एबझॉरब्शन ( पीएसए) ऑक्सिजन सयंत्राना पीएम केअर्स फंडा अंतर्गत
सहज वाहून नेण्याजोग्या ऑक्सिजन उपकरणांची खरेदी आणि पीएसए सयंत्राच्या उभारणीमुळे मागणीच्या क्लस्टर जवळ ऑक्सिजन पुरवठ्यात मोठी वाढ होणार आहे त्यामुळे ऑक्सिजन कारखाना ते रुग्णालय यादरम्यान ऑक्सिजन वाहतुकीच्या सध्याच्या आव्हानाची दखल घेतली जाणार आहे.
Jaydevi PS/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1714674)
Visitor Counter : 337
Read this release in:
English
,
Bengali
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam