आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारत सरकारने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत सुमारे 16 कोटी मोफत मात्रा पुरवल्या
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अद्यापही 1 कोटीपेक्षा जास्त मात्रा उपलब्ध
याशिवाय येत्या 3 दिवसात राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 57 लाखापेक्षा जास्त मात्रा मिळणार
Posted On:
28 APR 2021 3:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 एप्रिल 2021
कोविड-19 महामारी विरोधातल्या लढ्यात केंद्र सरकार अग्रस्थानी आहे. महामारी विरोधातल्या भारत सरकारच्या पंच सूत्री धोरणाचा लसीकरण हा महत्वाचा स्तंभ आहे. (चाचण्या, रुग्णाच्या संपर्कातल्या व्यक्तींचा शोध, उपचार आणि कोविडला प्रतिबंध करणारी वर्तणूक यांचा या पंच सूत्री धोरणात समावेश आहे.)
कोविड-19 लसीकरणाच्या व्यापक आणि वेगवान तिसऱ्या टप्प्याची 1 मे 2021 पासून अंमलबजावणी होणार आहे. नव्या पात्र वयोगटाच्या लसीकरणासाठीची नोंदणी आज ( 28 एप्रिल ) दुपारी 4 वाजल्यापासून सुरु होणार आहे. संभाव्य लाभार्थी, CoWIN पोर्टल (cowin.gov.in) किंवा आरोग्य सेतू ऐप द्वारे याची नोंदणी करू शकतात.
केंद्र सरकारने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत सुमारे 16 कोटी (15,95,96,140) मात्रा मोफत पुरवल्या आहेत. यापैकी वाया गेलेल्या मात्रा धरून एकूण 14,89,76,248 मात्रा वापरण्यात आल्या.
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अद्यापही 1 कोटीपेक्षा जास्त (1,06,19,892) मात्रा वापरण्यासाठी उपलब्ध आहेत.
याशिवाय येत्या 3 दिवसात राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 57 लाखापेक्षा जास्त मात्रा मिळणार आहेत.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या काही अधिकाऱ्यांचा दाखला देत,महाराष्ट्रात लसीचा साठा संपुष्टात आल्याने त्याचा राज्यातल्या लसीकरण मोहिमेवर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगणारे वृत्त काही माध्यमे देत आहेत.
या संदर्भात हे स्पष्ट करण्यात येत आहे की महाराष्ट्राला 28 एप्रिल 2021 रोजी (सकाळी 8 वाजेपर्यंत) एकूण 1,58,62,470 मात्रा प्राप्त झाल्या आहेत. यापैकी वाया गेलेल्या (0.22%) मात्रासह एकूण 1,53,56,151 मात्रांचा वापर करण्यात आला. राज्याकडे, उर्वरित 5,06,319 मात्रा, पात्र वयोगटातल्या लोकांना देण्यासाठी उपलब्ध आहेत.
याशिवाय येत्या तीन दिवसात कोविड प्रतिबंधक लसीच्या 5,00,000 मात्रा पोहोचण्याच्या मार्गावर आहेत.
S.Tupe/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1714609)
Visitor Counter : 240
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam