मंत्रिमंडळ
व्यापार सुधारणा उपाययोजना क्षेत्रात सहकार्य व्यवस्था स्थापन करण्याबाबत भारत आणि बांगलादेश यांच्यात सामंजस्य करार
प्रविष्टि तिथि:
20 APR 2021 5:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 एप्रिल 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने व्यापार उपचार महासंचालक (DGTR), भारत आणि बांगलादेश व्यापार व शुल्क आयोग, बांगलादेश दरम्यान व्यापार सुधारणा उपाययोजना क्षेत्रात सहकार्य व्यवस्था स्थापन करण्याबाबत सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजुरी दिली. ढाका येथे 27 मार्च 2021 रोजी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.
उद्दिष्टे
या सामंजस्य कराराचा प्राथमिक उद्देश व्यापार उपचार क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्याला प्रोत्साहन देणे, माहितीच्या देवाणघेवाणीसंदर्भातील व्यापक घडामोडींची माहिती देणे,आणि जागतिक व्यापार संघटनेच्या विविध तरतुदींच्या अनुषंगाने भारत आणि बांगलादेश यांच्यात द्विपक्षीय व्यापारात अँटी-डंपिंग, सुरक्षा उपाय क्षेत्रात क्षमता निर्मिती उपक्रम हाती घेणे हा आहे.
या सामंजस्य कराराद्वारे दोन्ही देशांच्या संबंधित अधिकाऱ्यांमध्ये चांगले सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न आहे जेणेकरून दोन्ही देशांमधील अनुचित व्यापार पद्धती टाळण्यासाठी आणि नियम आधारित द्विपक्षीय व्यापाराला प्रोत्साहन मिळेल.
* * *
S.Thakur/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1712986)
आगंतुक पटल : 312
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam