आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतात एकूण 12.71 कोटीहून अधिक लसीकरण मात्रा देण्यात आल्या
गेल्या 24 तासात 32 लाख मात्रा देण्यात आल्या
नव्या रुग्णांपैकी 78% रुग्ण 10 राज्यात, उपचाराधीन रुग्णांपैकी 62% रुग्ण केवळ 5 राज्यात
राष्ट्रीय मृत्यू दर आणखी कमी होऊन 1.18% झाला
Posted On:
20 APR 2021 11:50AM by PIB Mumbai
जगातल्या सर्वात मोठ्या लसीकरण अभियाना अंतर्गत भारतात आतापर्यंत 12.71 कोटी पेक्षा जास्त कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार भारतात 18,83,241 सत्राद्वारे लसीच्या 12,71,29,113 मात्रा (10,96,59,181 पहिली मात्रा आणि 1,74,69,932 दुसरी मात्रा) देण्यात आल्या.
यामध्ये 91,70,717 आरोग्य कर्मचारी (पहिली मात्रा), 57,67,657 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा), 1,14,32,732 फ्रंट लाईन कर्मचारी (पहिली मात्रा), 56,86,608 फ्रंट लाईन कर्मचारी(दुसरी मात्रा), 60 वर्षावरील 4,66,82,963 लाभार्थी (पहिली मात्रा), 47,04,601 (दुसरी मात्रा),45 ते 60 वयोगटातल्या 4,23,72,769 (पहिली मात्रा), आणि 13,11,066 लाभार्थी (दुसरी मात्रा) यांचा समावेश आहे.
देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 59.33% मात्रा आठ राज्यात देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासात 32 लाखापेक्षा जास्त लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
लसीकरण अभियानाच्या 94 व्या दिवशी (19 एप्रिल 2021) ला 32,76,555 लसीकरण मात्रा देण्यात आल्या. यामध्ये 22,87,419 लाभार्थींना 45,856 सत्रात पहिली मात्रा आणि 9,89,136 लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.
भारतात दैनंदिन नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. गेल्या 24 तासात 2,59,170 नव्या रुग्णांची नोंद झाली.
नव्या रुग्णांपैकी 77.67% रुग्ण, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान या दहा राज्यांमध्ये आहेत.
महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 58,924 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.त्यानंतर उत्तर प्रदेश 28,211 आणि दिल्लीत 23,686 नव्या रुग्णांची नोंद आली.
आलेखात दर्शवल्याप्रमाणे 20 राज्यात दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ दिसून येत आहे.
भारतात आज उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या 20,31,977 आहे. ही देशातल्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 13.26% आहे.
देशातल्या एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी 62.07% रुग्ण महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या पाच राज्यांमध्ये आहेत.
दैनंदिन पॉझीटीव्हीटी दर ( 7 दिवसांची सरासरी) चढता आलेख दर्शवत असून सध्या हा दर 15.99% आहे.
भारतात एकूण 1,31,08,582 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 85.56%.आहे.
गेल्या 24 तासात 1,54,761 रुग्ण कोरोनातून बरे झाले.
राष्ट्रीय मृत्यू दरात घट होत असून हा दर सध्या 1.18%.आहे.
गेल्या 24 तासात 1,761 रुग्णांचा मृत्यू झाला
यापैकी 82.74% मृत्यू दहा राज्यात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 351 जणांचा मृत्यू झाला, दिल्लीमध्ये 240 जणांचा मृत्यू झाला.
नऊ राज्ये / केंद्र शासित प्रदेशात गेल्या 24 तासात कोविड -19 मुळे एकही मृत्यू झालेला नाही. यामध्ये लडाख ( केंद्रशासित प्रदेश ), दमण आणि दीव आणि दादरा नगर हवेली, त्रिपुरा, सिक्कीम, मिझोरम, लक्षदीप, नागालँड, अंदमान आणि निकोबार आणि अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे.
***
UU/NC/CY
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1712837)
Visitor Counter : 397
Read this release in:
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Malayalam