शिक्षण मंत्रालय

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी आयआयटी हैदराबादच्या संशोधकांनी विकसित केलेली “जगातील पहिल्या परवडणाऱ्या आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या स्वच्छता उत्पादनांच्या दुरोकिया शृंखले” चे केले उद्‌घाटन

प्रविष्टि तिथि: 16 APR 2021 4:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 एप्रिल 2021

 

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल ‘निशंक’ यांनी आज आयआयटी हैदराबादमधल्या संशोधकांनी विकसित केलेली जगातील पहिल्या परवडणाऱ्या आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या स्वच्छता उत्पादनांच्या दुरोकिया शृंखले चे उद्‌घाटन केले. भारतीय तंत्रज्ञान संस्था, हैदराबादच्या संशोधकांनी बायोमेडिकल अभियांत्रिकीचे सहयोगी प्राध्यापक आणि आयटीआयसी, आयआयटी हैदराबाद येतील इफो केअर इनोव्हेशन प्रा. लि. चे संस्थापक डॉ. ज्योत्स्नेन्दु गिरी यांच्या नेतृत्वाखाली, कोविड-19 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी दुरोकीया दीर्घकाळ टिकणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यावेळी आयआयटी हैदराबादचे अध्यक्षबी. व्ही. आर. मोहन रेड्डी; ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, हैदराबाद, प्रो. संस्थापक डीन एम. श्रीनिवास; आयआयटी हैदराबादचे संचालक प्रा. बी. एस. मुर्ती आणि आयआयटी हैदराबादचे अन्य अधिकारी उपस्थित होते.दुरोकीया उत्पादने ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वावलंबनाच्या दृष्टीकोनाला अनुरूप आहेत असे पोखरीयाल यांनी सांगितले.

दुरोकिया अँटीमाइक्रोबियल तंत्रज्ञानाची ही नवीन उत्पादने 189 रुपयांपासून सुरु होतात, आणि यांच्या वापरामुळे 99.99% जंतूंचा नाश होतो आणि पुढील धुण्यापर्यंत 35 दिवसांपर्यंत दीर्घकाळ टिकणारा संरक्षणात्मक नॅनोस्केल लेप मागे सोडतो, असे ते म्हणाले.

दुरोकीया शृंखलेचा अनोखा गुणधर्म म्हणजे याचा वापर केल्यावर जंतूंचा त्वरित (60 सेकंदात) नाश होतो आणि दीर्घकाळ संरक्षण प्राप्त होते. सध्याच्या साथीच्या परिस्थितीत या बाबींची अत्यंत गरज आहे.

या कामगिरीबद्दल त्यांनी दुरोकिया तंत्रज्ञान पथका(टेक्नॉलॉजी टीम)चे अभिनंदन केले आणि आयआयटी हैदराबादच्या संशोधक आणि विद्यार्थ्यांना असेच मोठे कार्य करत राहून देशाला नावलौकिक मिळवून देण्याचे आवाहन केले.

आयआयटी हैदराबादचे संचालक प्रा. बी. एस. मुर्ती दुरोकिया टीमचे अभिनंदन करताना म्हणाले, संशोधनात आयआयटी हैदराबाद नेहमीच अग्रणी असते हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे, विशेषत: या साथीच्या काळात.

दुरोकिया एस, दुरोकिया एम, दुरोकिया एच आणि दुरोकिया एच एक्वा हे दुरोकिया टेक्नॉलॉजी वापरुन एक चिकट नॅनो फॉर्म्युलेशन तयार करते.यापैकी  प्रत्येक उत्पादनाची विस्तृत चाचणी  केली  आहे आणि भारत सरकारच्या वेगवेगळ्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये या उत्पादनांना अधिकृत मान्यता देण्यात आली  आहे.

प्रत्येक उत्पादनासोबत असलेल्या माहिती पत्रकात किंवा www.keabiotech.com या संकेतस्थळावर जाऊन त्याविषयीची  अधिक माहिती वाचा.

आयआयटी हैदराबादमधील जैववैद्यकीय अभियांत्रिकी विभागाने, डॉ. ज्योत्स्नेन्दू गिरी यांच्या नेतृत्वाखालील  टीमने विकसित केलेले हे आयआयटी हैदराबादमधील हे अत्यंत प्रभावी आणि परवडणारे संशोधन संशोधन आहे. या नवीन उपक्रमाबाबत डॉ. सुनील कुमार यादव, डॉ. कासिम एम.  मीनाक्षी चौहान आणि रुबी सिंहसुपर्णा बसूउज्मा हसनजयक कुमार आणि डॉ. पुरंदी रूपमणी यांचा एक समान दृष्टीकोन ठेवून हे संशोधन केले आहे

 

Jaydevi PS/S.Mhatre/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1712262) आगंतुक पटल : 280
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , Punjabi , English , Urdu , हिन्दी , Bengali , Kannada , Malayalam