PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 09 APR 2021 7:03PM by PIB Mumbai

 

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

 

Image

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

देशात कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या देण्यात आलेल्या एकूण मात्रांनी आज 9.43 कोटीचा टप्पा पार केला.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार भारतात 14,28,500 सत्राद्वारे 9,43,34,262 लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

लसीकरण अभियानाच्या 83 व्या दिवशी (8 एप्रिल 2021) लसीच्या 36,91,511 मात्रा देण्यात आल्या.. 49,416 सत्राद्वारे 32,85,004 लाभार्थींना पहिली मात्रा आणि 4,06,507 लाभार्थींना दुसरी मात्रा देण्यात आली.

जागतिक स्तरावर दैनंदिन मात्रांचे प्रमाण लक्षात घेता भारत दर दिवशी सरासरी 37,94,328 मात्रा देत असून अद्यापही सर्वोच्च स्थानावर आहे. भारतात दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ जारी आहे.गेल्या 24 तासात 1,31,968 नव्या रुग्णांची नोंद झाली.

महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश,दिल्ली,कर्नाटक,केरळ, मध्य प्रदेश, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान या दहा राज्यात कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या वाढती असून नव्या रुग्णांपैकी 83.29% रुग्ण या 10 राज्यात आहेत.

महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 56,286 नव्या रुग्णांची नोंद झाली.

भारतात आज उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या 9,79,608 आहे. ही देशातल्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 7.50% आहे.

देशातल्या एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी 73.24% महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक,उत्तर प्रदेश आणि केरळ या पाच राज्यांमध्ये आहेत. देशातल्या एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी 53.84% महाराष्ट्रात आहेत.

भारतात एकूण 1,19,13,292 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 91.22% आहे.

गेल्या 24 तासात 61,899 रुग्ण कोरोनातून बरे झाले.

गेल्या 24 तासात 780 रुग्णांचा मृत्यू झाला.

यापैकी 92.82% मृत्यू दहा राज्यात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 376 जणांचा मृत्यू झाला.

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली कोविड- 19 संदर्भात,उच्च स्तरीय मंत्री गटाची 24 वी बैठक आज दूर दृश्य प्रणालीद्वारे झाली. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप एस पुरी, बंदरे आणि नौवहन राज्य मंत्री मनसुख मांडवीय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री अश्विनीकुमार चौबे आणि गृह राज्य मंत्री नित्यानंद राय या बैठकीला उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोविड परिस्थितीबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.  यावेळी केंद्रीय गृहमंत्र्यांनी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तसेच लसीकरणाच्या सद्यस्थिती बाबतचा अंदाजही दिला यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव यांनी देशातील परिस्थिती विषयी सादरीकरण केले.

 

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन काल व्हर्चुअल स्प्रिंग मिटींग्ज 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या(आयएमएफ) आंतरराष्ट्रीय पत आणि आर्थिक समितीच्या( आयएमएफसी) गव्हर्नर मंडळाच्या पूर्ण बैठकीत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाल्या. या बैठकीत आयएमएफच्या 190 सदस्य देशांचे गव्हर्नर/ अल्टरनेट गव्हर्नर सहभागी झाले होते.

 

भारतीय रेल्वे, मागणीनुसार रेल्वे सेवा पुरवणे सुरू ठेवणार आहे. सध्या भारतीय रेल्वेच्या प्रतिदिन सुमारे 1402 विशेष रेल्वे सेवा सुरू आहेत. एकूण पाच हजार 381 उपनगरी रेल्वे सेवा आणि 830 प्रवासी रेल्वे सेवा सुद्धा सुरू आहेत. याशिवाय, विशेष मागणीनुसार 28 क्लोन रेल्वे गाड्याही सुरू आहेत.

 

महाराष्ट्र अपडेट्स

महाराष्ट्र - आज जारी करण्यात आलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार महाराष्ट्राने सर्वाधिक 93.38 लाख मात्रा दिल्या असून यामध्ये 84.35 लाख पहिली मात्रा आणि 9.03 लाख दुसरी मात्रा यांचा समावेश असून लसीच्या मात्रांच्या एकूण संख्येत महाराष्ट्राची कामगिरी अव्वल राहिली आहे. महाराष्ट्रानंतर राजस्थान 88.07 लाख आणि त्यानंतर 84.75 लाख मात्रांसह  गुजरातचा क्रमांक आहे.

दर आठवड्याला कोविड लसीच्या  40 लाख  मात्रा देण्याची मागणी  महाराष्ट्राने केली असून महाराष्ट्रात 5 लाख सक्रिय रुग्ण असून सर्वाधिक बाधित राज्य असल्याने लसीच्या आपल्या मागणीची प्राधान्याने दखल घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.

 

FACT CHECK

 

 

 

 

Image

Image

Image

Image

Image

Image

***

 

M.Chopade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1710721) Visitor Counter : 238