आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड- 19 संदर्भात डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री गटाची 24 वी बैठक
Posted On:
09 APR 2021 5:40PM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली कोविड- 19 संदर्भात, उच्च स्तरीय मंत्री गटाची 24 वी बैठक आज दूर दृश्य प्रणालीद्वारे झाली. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप एस पुरी, बंदरे आणि नौवहन राज्य मंत्री मनसुख मांडवीय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री अश्विनीकुमार चौबे आणि गृह राज्य मंत्री नित्यानंद राय या बैठकीला उपस्थित होते.
जगातल्या सर्वात मोठ्या लसीकरण अभियानाबाबत बोलताना, 60 वर्षावरील 3 कोटीहून अधिक लाभार्थींना लसीकरण मात्रा देण्यात आल्या आहेत. आज सकाळी नऊ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार 9.43 कोटी पेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वॅक्सीन मैत्री च्या माध्यमातून भारताने जागतिक समुदायाला नेहमीच समर्थन दिले असून त्या अंतर्गत 85 देशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या 6.45 कोटी मात्रा निर्यात केल्या आहेत. 25 देशांना व्यावसायिक कराराअंतर्गत 3.58 कोटी मात्रा पुरवण्यात आल्या आहेत. 44 देशांना अनुदान म्हणून 1.04 कोटी मात्रा तर 39 देशांना कोवॅक्स अंतर्गत 1.82 कोटी मात्रा पुरवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 149 जिल्ह्यात गेल्या सात दिवसात नव्या कोविड रुग्णांची नोंद नाही असे त्यांनी सांगितले. 8 जिल्ह्यात गेल्या 14 दिवसात, 3 जिल्ह्यात गेल्या 21 दिवसात आणि 63 जिल्ह्यात गेल्या 28 दिवसात नव्या कोरोना रुग्णाची नोंद झालेली नाही असे त्यांनी सांगितले.
***
M.Chopade/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1710698)
Visitor Counter : 345