अर्थ मंत्रालय

2020-21 या वित्तीय वर्षासाठी तात्पुरत्या आकडेवारीनुसार प्रत्यक्ष कर संकलनात सुमारे 5 %  वाढ


निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन हे 2020-21 या वित्तीय वर्षासाठीच्या प्रत्यक्ष कराच्या 9.05 लाख कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजाच्या 104.46%

2020-21 या वित्तीय वर्षासाठी अग्रिम कर संकलन 4.95 लाख कोटी, सुमारे 6.7% वाढ

कोविड-19 मुळे अर्थव्यवस्थेसमोर आव्हाने आली असतानाही  2020-21 या वित्तीय वर्षासाठी निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन चढे

2020-21 या वित्तीय वर्षात 2.61 लाख कोटी रुपयांचे परतावे जारी

Posted On: 09 APR 2021 2:22PM by PIB Mumbai

 

2020-21 या वित्तीय वर्षासाठी तात्पुरत्या आकडेवारीनुसार प्रत्यक्ष कर निव्वळ संकलन 9.45 लाख कोटी रुपये झाले. निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात कोर्पोरेशन कर (सीआयटी) 4.57 लाख कोटी, आणि वैयक्तिक प्राप्ती कर (पीआयटी), सुरक्षा व्यवहार करासह ( एसटीटी) 4.88 लाख कोटी रुपये यांचा समावेश आहे. निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन हे 2020-21 या वित्तीय वर्षासाठीच्या प्रत्यक्ष कराच्या 9.05 लाख कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजाच्या 104.46% आहे.

2020-21 या वित्तीय वर्षासाठी प्रत्यक्ष कर ढोबळ संकलन (परतावे समायोजित करण्यापूर्वी) 12.06 लाख कोटी रुपये आहे. यामध्ये कोर्पोरेशन कर (सीआयटी) 6.31 लाख कोटी, आणि वैयक्तिक प्राप्ती  कर (पीआयटी), सुरक्षा व्यवहार करासह (एसटीटी) 5.75 लाख कोटी रुपये, अग्रिम कर  4.95 लाख कोटी रुपये, उद्गम कर (केंद्रीय उद्गम करासह) 5.45  लाख कोटी, स्व निर्धारित कर 1.07 लाख कोटी रुपयेनियमित निर्धारण कर 42,372 कोटी रुपये, लाभांश वितरण कर 13,237 कोटी रुपये आणि इतर किरकोळ नावाखालील 2,612 कोटी रुपये  यांचा समावेश आहे.

अतिशय आव्हानात्मक वर्ष असूनही 2020-21 या वित्तीय वर्षासाठी अग्रिम कर संकलन 4.95 लाख कोटी रुपये असून लगतच्या मागील वित्तीय वर्षाच्या 4.64 लाख कोटी रुपयाच्या  तुलनेत यात सुमारे 6.7%  वाढ दिसून येत आहे.

2020-21 या वित्तीय वर्षात 2.61 लाख कोटी रुपयांचे परतावे जारी करण्यात आले, 2019-20 या वित्तीय वर्षात 1.83 लाख कोटी रुपयांचे परतावे जारी करण्यात आले होते, म्हणजेच आधीच्या वित्तीय वर्षाच्या तुलनेत सुमारे 42.1% वाढ झाली आहे.

ही दिलेली आकडेवारी तात्पुरती आहे, संकलनाची अंतिम आकडेवारी आल्यानंतर यात बदल होऊ शकतो.

 

M.Chopade/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1710628) Visitor Counter : 231