PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 08 APR 2021 6:29PM by PIB Mumbai

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 8 एप्रिल 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड-19 लसीची दुसरी मात्रा घेतली.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

गेल्या 24 तासात लसींच्या सुमारे 30 लाख मात्रा देण्यात आल्या, देशात एकूण  लसीकरण  9 कोटींच्या वर

जागतिक स्तरावर, दररोज सरासरी 34 लाखांपेक्षा जास्त मात्रा देऊन भारत आघाडीवर आहे

जागतिक महामारीविरूद्ध सामूहिक आणि सहकार्यात्मक लढ्यात  यावर्षी 16 जानेवारी रोजी सुरू करण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमे अंतर्गत भारताने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. देशभरात आतापर्यंत एकूण लसीकरण मात्रांची संख्या आज 9 कोटींच्या पुढे गेली  आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार आतापर्यन्त एकूण 13,77,304 सत्रांद्वारे 9,01,98,673 लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत .

जागतिक स्तरावर दररोज दिल्या जाणाऱ्या मात्रांच्या बाबतीत भारत सरासरी 34,30,502 मात्रा देऊन  अव्वल स्थानावर आहे.

भारतात दररोज नवीन रुग्णांची संख्या वाढतच आहे. गेल्या 24 तासांत 1,26,789 नवीन रुग्णांची नोंद झाली.

महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, केरळ,  पंजाब या दहा राज्यांत कोविड रुग्णांच्या दैनंदिन नवीन संख्येत वाढ दिसून येत आहे. या 10 राज्यांमधील नवीन रुग्णांपैकी  84.21% रुग्ण या 10 राज्यात आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक 59,907 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल छत्तीसगडमध्ये 10,310 आणि कर्नाटकात 6,976 नवीन रुग्णांची  नोंद झाली आहे.

मार्च आणि एप्रिल 2021 च्या पहिल्या सात दिवसात राज्य / केंद्रशासित प्रदेशांच्या साप्ताहिक सकारात्मकतेच्या दराची तुलना  खालील आलेखात दाखवली आहे. याच काळात राष्ट्रीय साप्ताहिक सकारात्मकता दर  6.21% वाढून 2.19% वरून 8.40% वर गेला आहे.

भारताचे एकूण सक्रिय रुग्णसंख्या 9,10,319 वर पोहोचली  आहे. ही संख्या देशातील एकूण बाधित रुग्णांच्या  7.04% आहे. गेल्या 24 तासांत एकूण सक्रिय रुग्णामधून  66,846 रुग्णांची  नोंद झाली आहे.

महाराष्ट्र,  छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि केरळमध्ये देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 74.13% रुग्ण  आहेत. देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 55.26% रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत.

भारतात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आज 1,18,51,393 इतकी  आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 91.67% आहे.

गेल्या 24 तासात 59,258 रुग्ण बरे झाले.

गेल्या 24 तासांत 685 मृत्यूची  नोंद झाली.

नवीन मृत्यूंपैकी 87.59%  मृत्यू दहा राज्यांमधील आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 322 मृत्यू झाले आहेत .  पंजाबमध्ये  62 मृत्यू झाले आहेत.

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे निवेदन

अलीकडच्या काही दिवसात काही राज्य सरकारांकडून कोविड-19 महामारीसंदर्भात अनेक बेजबाबदार वक्तव्ये केली जात असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. या वक्तव्यांमुळे जनतेची दिशाभूल होण्याची आणि त्यांच्यात घबराट पसरण्याची शक्यता असल्याने वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे अतिशय गरजेचे झाले आहे

1 एप्रिल 2021 रोजी कोविड लसीकरणाची व्याप्ती 45 वर्षे किंवा त्याहून जास्त वयाच्या नागरिकांपर्यंत  पोचवल्यावर मोठ्या प्रमाणावरील अर्थ व्यवस्थेच्या संघटित क्षेत्रात कार्यरत असणारे नागरिक तसेच उत्पादन किंवा सेवाक्षेत्रासारख्या खाजगी सरकारी क्षेत्रात रोजगार असणाऱ्या व्यक्तींपर्यंत लसीकरण पोहोचवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

 

कोविड रुग्णसंख्येत सध्या अतिशय झपाट्याने झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने या महामारीच्या फैलावाला प्रतिबंध करण्यासाठी हाती घेतलेल्या उपाययोजनांचा केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री( स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज आढावा घेतला.

 

महाराष्ट्र अपडेट्स

केंद्राकडून राज्याला कोविड  लसीचे 7.40 लाख डोस प्राप्त झाले असल्याचे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री  राजेश टोपे यांनी आज स्पष्ट केले. टोपे म्हणाले की, राज्यातील मागणी पूर्ण करण्यासाठी लसींचा हा पुरवठा अपुरा आहे आणि त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना दर आठवड्याला 40 लाख डोस देण्याची विनंती केली आहे.  महाराष्ट्रात बुधवारी 59,907 नवीन रुग्णांची नोंद झाली असून  सक्रिय प्रकरणांची संख्या 5.01 लाखांवर गेली आहे.

FACT CHECK

Image

Image

Image

Image

Image

Image

 

 

* * *

MC/DR

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1710483) Visitor Counter : 217